शिवाजी महाराज बलात्काराच्या गुन्ह्यासाठी कोणती शिक्षा द्यायचे? चौरंग शिक्षा म्हणजे काय?
यादव साम्राज्यानंतर काळानंतर मुघल, आदिलशाही आणि निजामशाहीत पिळवणूक सहन करून नुकतेच स्वराज्याचे स्वप्न रयत बघु लागली होती, परंतु वतनदारी मिळालेले काही सरदार रयतेला वेठीस धरण्याचे प्रकार वारंवार होत होते. पाटलांच्या,वतनदारांच्या मनात खोलवर चिखलात रुतून पडलेल्या जनावराप्रमाणे घर करून बसलेली मोगलाई मात्र उतरायचे नावच घेत नव्हती. उगवत्या सूर्याकडे आशेने पाहताना रयत राजरोज हुंदक्या मागून हुंदके देत होती. कुंपणानेच शेत खाल्लं तर न्याय मागायचा कुणाला आणि आपलं दुःख सांगायचे कुणाला. अशी रयतेची स्थिती होती.
एके दिवशी असाच एक प्रकार घडला,
पुण्यापासून नऊ कोसांवर असलेल्या रांझे गावचा पाटील बाबाजी उर्फ़ भिकाजी गुजर याने एका स्त्री सोबत गैरवर्तन केल्याचे महाराजांच्या कानी आले.
रांझे,रांझे गावचा पाटील, भिकाजी गुजर याचे नाव आधीपासूनच असल्या गुन्ह्यासाठी प्रसिद्ध होते. पण गावचा पाटील म्हणजे कोण अडवणार… कोण शिक्षा करणार…
याआधी सुद्धा पाटलाने असेच शेण खाल्ले तरीही कोणी निवाडा केला नसल्याने लोकं निमूटपणे अन्याय सहन करत होते.
पण यावेळी लाल महालात खुद्द माँसाहेब जिजाऊ न्यायनिवाडा करण्यास बसल्या होत्या. त्यांना ही बातमी समजताच त्यांच्या रागाचा पारा चढला, ज्या रयतेने एवढे वर्ष अन्याय सहन केला त्या रयतेवर आपल्या अधिपत्याखाली असा अन्याय होतोय यावरून त्या चवताळल्या.
रांझे हे गाव जिजाऊंच्या मालकीचे त्यांच्या वैयक्तिक खर्चासाठी ह्या गावची मालकी आऊसाहेबांकडे आणि त्यांच्याच गावात हा गुन्हा म्हणजे घोर पाप कारण रयतेवर प्रेम करणारी आई रयत नासवना-यांच्या विरुद्ध जणू चंडीचे रूपच धारण करण्याची वेळ आली होती.
परंतु राजे आता जाणते झाले होते, त्यांनी याचा निवाडा करण्याचे ठरवले.
शिवाजी महाराजांनी तातडीने बाबाजी उर्फ़ भिकाजी गुजर ला सदरेस बोलावून घेतले. न्यायनिवाडा करण्यासाठी सर्वांसमोर महाराजांनी बाबाजीची चौकशी केली, चौकशीअंती गुन्हा सिद्ध झाला. या गुन्ह्याला आता महाराज कोणती शिक्षा देणार याचा अंदाज कोणालाही लागत नव्हता. बाबाजीला साधी शिक्षा केल्यास रयतेत उठसुठ कोणीही हे दुष्कर्म करत फिरेल याची महाराजांना जाण होती.
शिवाजी महाराज चौरंग शिक्षा
शिवरायांनी कठोर शिक्षा देण्याचे फर्मान दिले, त्वरित त्याची पाटीलकी जप्त केली गेली. इतकेच नव्हे तर त्याला या दुष्कर्माबद्दल त्याचे हात पाय कलम केले गेले. सर्वांसमक्ष बाबाजीला चौरंग करण्याची शिक्षा म्हणजे दिली गेली.
पण हात पाय कलम केल्यानंतर रक्तस्त्राव होउन दगावू नये यासाठी जखमा गरम तुपात बूडवल्या गेल्या. गैरकृत्याला माफी नाही मग तो कोणीही असो याची जान सर्वांना यावी यासाठी महाराजांनी ही चौरंग शिक्षा अशी कठोर शिक्षा दिली.
जनतेला ३०० वर्षाच्या मोगलाई नंतर न्याय देणारा वेगळा राजा स्वराज्यातील जनतेच्या लक्षात आले!
चौरंग शिक्षा केल्यानंतर शिक्षा पूर्ण करून त्याच्या पालनपोषणाची व्यवस्था मृदू मनाच्या महाराजांनी केली. बाबाजी निपुत्रिक असल्याने त्याच्या अपंगावस्थेत त्याचा सांभाळ करायची तयारी गुजर कुळीच्याच सोनजी बिन बनाजी गुजर याने दर्शविली.
महाराजांनी याबदल्यात मेहेरबान होऊन रांझेची पाटीलकी सोनजीच्या नावे करत बाबाजीस पालनपोषणार्थ त्याच्या स्वाधीन केले.
Star प्रवाह वर प्रदर्शित झालेल्या राजा शिवछत्रपती या मालिकेत दाखवलेला हा प्रसंग
शिवकालीन पुरावे: या घटनेचे संदर्भ २८ जानेवारी १६४६ चे शिवरायांची मुद्रा असलेले पत्र सापडले आहे त्यात सापडते

आजकाल आपल्या आसपास बलात्कार प्रकरणे एवढी वाढली असूनही गुन्हेगाराला कठोर शिक्षा दिली जात नाही. आपणास याबद्दल काय वाटते हे आम्हाला नक्की कळवा…
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
कोंडाजी फर्जंद: फर्जंद चित्रपटातील मुख्य पात्र फर्जंद कोण होता? पन्हाळगड लढाई कशी झाली
रहस्य शिवाजी महाराज यांच्या बेमतलब मृत्यूचं | Shivaji Maharaj Death Mystery