शिवाजीनगर बस स्थानक मधील MSRTC बस आता मुळा रोड वरून सुटणार

0
शिवाजीनगर बस स्थानक मधील MSRTC बस आता मुळा रोड वरून सुटणार

पुणे, शिवाजीनगर बस स्थानक मधील MSRTC च्या बस आता मुळा रस्त्यावरील सरकारी दूध योजना जागेवरील नवीन स्थानकावरून सुटणार आहेत.

शिवाजीनगर बस स्थानक स्थलांतर

पुणे मेट्रो चे स्थानक शिवाजीनगर बस स्थानकात होणार आहे. तसा करार मेट्रो प्राधिकरण आणि MSRTC मध्ये झालेला आहे. शिवाजीनगर बस स्थानकाच्या जागेच्या बदल्यात मेट्रो प्राधिकरण दोन मजली इमारत बांधणार आहे ज्यात बसस्थानक आणि मेट्रोस्थानक दोन्हीही असणार आहे.
Shivajinagar bus stand pune
१ ऑक्टोबर पासून बसस्थानकातील सर्व सुविधा सरकारी दूध योजनेच्या ५ एकर जागेवर सुरू करण्यात येणार आहेत. मुळा रोड वरून या सुविधा पुरविल्या जाणार आहेत.
मेट्रो स्थानकाचे भुयारी काम लवकरात लवकर पूर्ण करून बस स्थानक पूर्ववत करण्यात येणार असल्याची माहिती पुणे मेट्रो च्या अतुल गाडगीळ यांनी दिली.
प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. शासकीय दूध योजना जागेवरील स्थानक शिवाजीनगर स्थानकापासून जवळपास १.२ किलोमीटर लांब असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

Best Misal in PUNE, Famous Misal Pav Hotels in Pune List

भारताची राष्ट्रीय भाषा कोणती? हिंदी राष्ट्रभाषा आहे का?

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.