शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

0
शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

पुणे: शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रोच्या नवीन तिसऱ्या टप्प्याला राज्य मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे.  या प्रस्थापित मार्गावर एकूण 23 स्टेशन्स असणार आहेत. औंध, बाणेर, बालेवाडी मार्गाने पुणे – बंगलोर महामार्गाने वाकड कडून हिंजवडी असा मार्ग कापत ही मेट्रो जाईल. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी याबाबतची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली आहे. केंद्राकडून यापूर्वीच मान्यता मिळाली होती आणि राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी प्रतीक्षा होती त्याबाबत निर्णय घेऊन मंजुरी दिली गेली आहे.

PC: http://www.punemetrorail.org/img/logo.png

साडेतेवीस किलोमीटर लांबीचा हा मार्ग शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गाने जाणार्या प्रवाशांसाठी संवर्धिनी ठरणार आहे. मेट्रोचा प्रत्येक १ किमी वर एक स्थानक असून हिंजवडी येथील एमआयडीसीच्या 55 एकर जागेत मेट्रोचा स्वतंत्र डेपो उभारणार असल्याची माहिती सांगितली.  पुणे महापालिकेचा चालु असलेल्या मेट्रो प्रकल्पास हा मार्ग शिवाजीनगर येथे जोडण्यात येणार आहे. मेट्रोच्या तिकिटाचा दर साधारणतः आठ ते  तीस रुपये असेल. लवकरच प्रकल्पाला सुरुवात होऊन २०२० पर्यंत प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट PMRDA च्या अंगावर असणार आहे.

PC: https://goo.gl/4SCuYx

सार्वजनिक व खाजगी सहभागाने दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशन आणि पी.एम.आर.डी.ए. यांच्या एकत्रीकरणातून  हा प्रकल्प साकारणार आहे. पुण्यातील अंतर्गत प्रवासाला यामुळे गती मिळेल आणि रस्त्यावरील गर्दीवर नियंत्रण येईल अशी अशा सर्व पुणेकरांकडून व्यक्त केली जात आहे. प्रस्थापित मेट्रोतून एका वेळी ७६४ प्रवासी प्रवास करु शकतील.

या प्रकल्पाचा एकूण खर्च ८३१३ कोटी रुपये असून त्यापैकी केंद्र सरकार ११३७ कोटी तर राज्य सरकारचा ८१२ कोटी रुपयांचा वाटा उचलणार आहे. उर्वरित रक्कम खाजगी भागीदारीतून येणार आहे.  वेळेआधी या प्रकल्पाची पूर्तता करून प्रवाशांच्या सेवेत मेट्रो लवकरच आणू असा विश्वास गिरीश बापट यांनी दिला.

©PuneriSpeaks

LEAVE A REPLY