सोशल मिडीया आणि आपली मानसिकता…

0
सोशल मिडीया आणि आपली मानसिकता…

सोशल मिडीया आणि आपली मानसिकता…

आज खुप दिवसांनी लिहायचं ठरवलं पण मनासारखां विषयच सापडत नव्हता. अचानक आज सकाळी बघितलं माझ्या मित्रमंडळांची whatsup च्या स्टेटस वर त्यांच्या मित्रांची नावं पोस्ट करायची चालली होती. मग काय मला लिहण्यासाठी विषय सापडला. लगेच या विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी नेहमी सारखा माझ्या विचारांत गुरफटत गेलो. आजकाल सोशल मिडीया आणि युवापिढीच जरा घट्टच नातं झालंय अस नाही का वाटत तुम्हाला. म्हणजे फक्त तुम्ही नाही तसा मि पण त्यातच येतो बरकां….

मि जेव्हा मोबाईल मध्ये पार डोक घालुन काहीतरी वाचत असतो तेव्हा माझी आजी मला नेहमी म्हणते “नक्की काय करता रे तुम्ही त्या मोबाईल मध्ये ? सारखी कोबंडी उकरते तसं उकरत बसता…” पण खरंच कधीकधी मला नेहमी असं वाटत ‘सोशल मिडीया‘ कदाचीत आता मँरेज ब्युरो झालंय.प्रेमासारख्या अतिशय खाजगी नात्याचा या सोशल मिडीयावर बाजार झालाय. या सोशल मिडीयामुळे अनेक ‘शुभमंगल’ झालेत हे खरंय.पण कशासाठी ? तर आपल्या कोर्टांचे कामकाज वाढवण्यासाठी. पण रात्री जोडली जाऊन सकाळी तुटणारी नाती जर आजकाल निर्माण होत असतील तर त्या नात्याला नक्की प्रेमाचं नाव दयायचं का ?. पुर्वीच्या काळातील युवापिढीचं ‘प्रेम’ आणि आत्ताचे युवापिढीचे ‘प्रेम’ जरा वेगवेगळेच आहे अस म्हटलं तरी हरकत नाही…

आज युवापिढीच्या विचारांवर विचार करण्याची वेळ आलीय अस मला तरी वाटतं कारण बघाना.. आज कालच्या वाढत्या बेरोजगारीच्या काळात युवापिढीला एखाद्या बँकेत अकांऊट उघडण्या अगोदर पहिलं सोशल मिडीयावर अकाऊंट उघडण जास्त महत्वाचं वाटतं. यापुर्वीच्या काळात आपण तंबाखु , सिगरेट किंवा गुटख्याच व्यसन पाहीलं असले परंतु यापुढे युवापिढीला फेसबुक , व्हाँटसअप & इंन्स्टाग्रामचे व्यसन झडलेले असेल. परत या आजारांवर सुद्धा बाजारात औषध येतील…

पण आजकालच्या युवापिढीला मला फक्त एवढंच सांगायचंय ‘सोसल’ तेवढाच ‘सोशल मिडीया‘ वापरा…

लेखक – प्रेम शंकरराव भोसले

©PuneriSpeaks

कोणीही लेख चोरू नये. लेख आवडल्यास नक्की शेअर करा.

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

बैल: एक वैचारीक विषय

होय मि तुमची लालपरी: एस टी बोलतेय…

उन्हापासून संरक्षण तब्येतीला जपण्यासाठी १६ उपाय

LEAVE A REPLY