शूरवीर तानाजी मालुसरे यांच्यावर आधारित अजय देवगन चा ‘तानाजी’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज

0
शूरवीर तानाजी मालुसरे यांच्यावर आधारित अजय देवगन चा ‘तानाजी’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज

मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत दिग्दर्शित ‘तानाजी’ चित्रपट २०१९ मध्ये रिलीज होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यां मध्ये असणारे एक शूरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असेल. तानाजी मालुसरे यांचे नाव ऐकले तरी त्यांचा इतिहास सर्व मराठी जणांच्या समोर उभा राहतो.  त्याच इतिहासावर आधारित हा चित्रपट नक्कीच संपूर्ण जगात एका वेगळ्या माध्यमातून मराठ्यांचा इतिहास जागा करेल.

नुकताच अजय देवगन याने त्याच्या ट्विटर अकाऊंट वर चित्रपटाचा पोस्टर पोस्ट केला आहे.

 

ओम राऊत या मराठमोळ्या दिग्दर्शकाला लोकमान्य या मराठी चित्रपटास फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.

 

हा चित्रपट २०१९ ला रिलीज होणार आहे, त्यामुळे प्रेक्षकांना चांगलीच वाट पहावी लागणार आहे.

 

कमेंट मध्ये नक्की लिहा…

LEAVE A REPLY