Tourism Near Pune City, पुणे परिसरातील पर्यटन स्थळे…

0
Tourism Near Pune City, पुणे परिसरातील पर्यटन स्थळे…

Tourism Near Pune City पुणे शहर परिसरात जवळपास फिरायला जायचेय तर या ठिकाणी नक्की भेट द्या..

विद्येचे माहेर घर आणि महाराष्ट्राची सांस्कॄतीक राजधानी पुणे, अश्या पुण्याला आपण भेट देणार असाल तर या स्थळांना अवश्य भेट द्या. Tourism Near Pune City मध्ये आपणांस शहरातील पर्यटन स्थळांची पुरेपूर माहिती मिळेल. पुण्याची संस्कॄती, वारसा आणि इतिहास पुण्याच्या पर्यटन स्थळांमधुन झळकतो. समुद्र सपाटी पासुन ५६० मीटर्स उंची वर पुणे सर्वच ऋतुंमध्ये पाहू शकता. पुण्याने आपली संस्कृतीही अजूनही जपुन ठेवली आहे. हीच संस्कृती आणि विविधता बघण्यासाठी पुणे परिसरातील पर्यटन स्थळे आपण पाहू शकता

पुणे परिसरातील पर्यटन स्थळे | Tourism Near Pune City

1. राजीव गांधी सर्पोद्यान पार्क

Rajeev Gandhi Sarpodyan Pune
Rajiv Gandhi Park, Katraj

कात्रज सारख्या वेगाने वाढत जाणार्या भागात १३० एकर भागात पसरलेले हे उद्यान विविध प्रजातीचे सर्प, प्राणी यांसाठी प्रसिध्द आहे. या उद्यानात फिरून फिरून तुम्ही थकाल पण प्राणी मात्र बघून संपणार नाहीत. शहरी कचाट्यात नैसर्गिक सौंदर्य बघण्यासाठी या राजीव गांधी सर्पोद्यान पार्क ला अवश्य भेट देऊ शकता.

2. शनिवार वाडा

Tourism near pune city Shaniwar Wada
Shaniwar Wada

Tourism near Pune City मधील दुसरे पर्यटनस्थळ म्हणजे शनिवार वाडा. शनिवार वाडा म्हणजे पुण्यातील एक ऐतिहासिक वास्तू, पेशवे बाजीराव यांचे निवासस्थान व कार्यालय. इंग्रजांनी वाड्यावर कब्जा केल्यानंतर एके दिवशी वाड्याला आग लागून सगळे अवशेष नष्ट झाले. आता या वास्तू मध्ये फक्त पायाचा भाग उरलेला असून वाड्याची तटबंदी बघण्यासारखी आहे.

3. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

Tourism near pune city Shrimant Dagadusheth Halwai Mandir
Shrimant Dagadusheth Halwai Mandir

सन १८९३, श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे त्या काळातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. पुण्यात आलेल्या प्लेग च्या साथीत त्यांच्या मुलाचे देहावसान झाले त्यामुळे त्यांनी एका महाराजांच्या सांगण्यावरून गणपती आणि दत्त यांची मूर्तीची स्थापना केली तेव्हापासून दगडूशेठ गणपती ची विशेषता सगळीकडे पसरलेली आहे. पुण्यात आलात आणि दगडूशेठ गणपती चे दर्शन नाही घेतले असे सहसा कोणाकडून होत नाही. गणपती विसर्जन मिरवणुकीत या गणपतीला विशेष मान असून मंडळाची मिरवणूक भव्यदिव्य असते. तेव्हा चला उरका पटापट, दर्शनाला जाऊयात. Tourist attractions in Pune मध्ये दगडूशेठ गणपती हे ठिकाण येते.

4. प्रती बालाजी मंदिर

Prati Balaji Pune

केतकवळे, नारायणपूर पुण्यापासून जवळपास ३५ ते ४० किमी अंतरावर असलेले शांत ठिकाण. तीरुपल्ली बालाजी ची हुबेहूब नक्कल बनवलेली आहे. येथे जवळच नारायणपूर मध्ये दत्ताचे मंदिर खूप प्रसिध्द असून एकाच वेळी दोन ठिकाणे फिरून होण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे.

5. सिंहगड

Tourism near pune city Sinhgad Fort
सिंहगड किल्ला (कोंढाणा)

आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाच” हे वाक्य कोण विसरणार. तानाजी मालुसरे यांनी आपल्या जीवावर हा किल्ला जिंकून स्वराज्याच्या विस्तारात एक मोलाची भर टाकली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांनी या किल्याचे नाव बदलून सिंहगड केले. पुण्यात सगळ्यात जास्त बघायला जाणार्या ठिकाणांमध्ये सिह्गड गणला जातो.

6. सारसबाग

Sarasbaug, Pune

पुण्यात आलात आणि सारसबागेतली भेळ नाही खाल्ली असा पुणेकर शोधून सापडणार नाही. शहराच्या मधोमध एक दुपार-सायंकाळ घालवण्यासाठीचे एक प्रसिध्द ठिकाण. निवांत वेळ घालवण्यासाठी या बागेला भेट देण्यास काही हरकत नाही.

7. राजगड

Rajgad, Pune

कोणीही अवघड ट्रेकिंगला जातोय म्हणतायेत म्हणजे ते ट्रेकिंग राजगड चेच असणार. एक भव्यदिव्य असा किल्ला. शिवाजी महाराज यांनी निवडलेली स्वराज्याची राजधानी(नंतर स्वराज्याची राजधानी रायगड ला बनवण्यात आले) म्हणजे दूरदृष्टीची प्रचीती देणारा निर्णयच. किल्यावर तीन माच्या आणि एक बालेकिल्ला असुन निसर्ग सौंदर्याने हा किल्ला परिपूर्ण नटलेला आहे. पृथ्वीवरील स्वर्ग म्हणजेच राजगड….

8. चतुश्रुंगी मंदिर

Chatushrungi Mandir, Pune

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात बांधलेले मंदिर अशी या मंदिराची ख्याती असून देवीच्या दर्शनाला पुण्यातून भरपूर गर्दी असते. पुण्यातल्या पुण्यात येता जाता या मंदिरात फिरायला जायला पुणेकरांना जास्तच आवडते.

9. पर्वती टेकडी

Parvati Mandir, Pune

टेकडीच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत जी १७४९ च्या आसपास बांधली गेली आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी या टेकडीवर देवदेवतांची मंदिरे बांधवून घेतली. पेशव्यांचे प्रार्थना ठिकाण म्हणून हि टेकडी जास्त प्रसिध्द आहे. नानासाहेब पेशवे यांच्या काळात पर्वती मंदिराला जास्तच उजाळा मिळाला.

10. लवासा सिटी

Lavasa city, Pune, Top 10 places to visit near pune
Lavasa City

नैसर्गिक सौंदर्यापेक्षा वादामुळे जास्त प्रसिध्द असलेली लवासा सिटी. पुण्यापासून ६० किमी वर वसलेले हे अत्याधुनिक शहर म्हणजे वाखाणण्यासारखे आहे. येथील प्रशस्थ बांधकाम, त्यातील कला बघण्यासारखी आहे. आपण भारतात नसून परदेशात आल्यासारखा इथे अनुभव येतो. परंतु सध्या लवासा भेटीसाठी २ व्हिलर साठी १०० रुपये प्रत्येकी आणि ४ व्हिलर साठी ५०० रुपये पार्किंग फी घेतली जाते.

11. आळंदी

Alandi, Pune

देवाची आळंदी” म्हणजेच संत ज्ञानेश्वर महाराज यांचे समाधी मंदीर. इंद्रायणी काठी वसलेले ज्ञानेश्वर मंदिर म्हणजे भाविकांसाठी स्वर्गानुभवच….

12. गाथा मंदिर देहू

Gatha Mandir, Dehu

Tourism Near Pune City मधील अजून एक प्रेक्षणीय स्थळ म्हणजे देहू गाथा मंदिर. देहू या गावी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे जन्मस्थान इंद्रायणी नदीच्या काठी आहे. देहू येथूनच श्री तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले अशी आख्यायिका आहे. नवीन बांधलेले गाथा मंदिर नक्की भेट देण्याजोगे आहे.

तर अशी ही होती Tourism Near Pune City ची आमची सूची. आम्हाला सांगा पुण्यातील तुमची आवडती ठिकाणे कोणती? तर चला फिरुया……

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

History of PUNE: पुण्याचा इतिहास, असे घडले पुणे…..!

Best Pawna Lake Camping For Couples: Top 3 Pawna Camping

Mumbai vs Pune Memes: Mumbai Pune Jokes all in one Combo Pack, Who is the Best? Pune or Mumbai

Swine Flu Information in Marathi । स्वाइन फ्लू ची लक्षणे । स्वाईन फ्लू आजार कसा टाळावा

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.