दुचाकी चारचाकी वापरताय का ? : पुणे महानगरपालिका करणार आहे ‘ ही ‘ कारवाई

0
दुचाकी चारचाकी वापरताय का ? : पुणे महानगरपालिका करणार आहे ‘ ही ‘ कारवाई

आपल्याकडे कोणती दोन चाकी चार चाकी गाडी आहे का ? तर ही बातमी आपल्यासाठीच आहे . आणि आपण ती पार्किंग मध्ये न लावता रस्त्यावर लावत असाल तर ही बातमी पूर्ण वाचा.

गेली अनेक महिने रस्त्यावर बेवारस पडून असलेली वाहने आता दंडक कृती करून ताब्यात घेण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे . तसेच वाहन मालकांना दंड देखील करण्यात येणार आहे. मुख्य रस्त्यासह गाली बोळात देखील ही मोहीम राबवण्यात येणार असून पुढील महिनाभर ही कारवाई सुरु राहणार आहे.

पुणे शहर आणि उपनगरा मधील अनेक रस्त्यांवर बेवारस वाहने पडून आहेत. त्या त्या परिसरातील रहिवाश्यांना वेळोवेळी सूचना करूनही कोणीही काही कृती करत नाही . खूप वर्दळीच्या ठिकाणी अशा वाहनांमुळे रहदारीस अत्यंत अडचण होत असून रस्त्यालगतच्या हातगाड्या व स्टॉल देखील काढण्याची पोलिसांनी मागणी केली आहे .

या पार्श्वभूमीवर अतिक्रमणे काढून रस्त्याचा श्वास मोकळा होणे गरजेचे झाले आहे . वाहतुकीसाठी रस्ते मोकळे करण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाईस सुरुवात केली आहे . ही बेवारस वाहने उचलून ताब्यात घेणार आहेत .

?पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.