आर्थिक संकटात ‘रेमंड’चा मालक

0
आर्थिक संकटात ‘रेमंड’चा मालक

देशातील मोठा ब्रँड असणाऱ्या रेमंड कंपनीचे मालक विजयपत सिंघानिया यांना मुलाने बेदखल केले असल्यामुळे ते आर्थिक संकटाशी झुंज देता आहेत.
त्यांच्यावर भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली असून त्यांनी आपल्या मुलावर गौतम सिंघानियाने आपल्यावर हि वेळ आणली असा आरोप करत सिंघानिया यांनी आपल्या मुलाला कोर्टात खेचले आहे.

विजयपत सिघानिया यांनी रेमंड लिमिटेड कंपनीची सूत्रे आपल्या मुलाच्या हाती देऊन निवृत्त झाले होते.मात्र मुलासोबतच आर्थिक वाद झाल्याने त्यांना भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे.विजयपत सिंघानिया यांनी मलबार हिल्स येथील ड्युप्लेक्स फ्लॅटचा ताबा मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचं वृत्त ‘मुंबई मिरर’ने यापूर्वीच दिलं होतं. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर त्यांच्याच वकिलाने सिंघानिया कसे पैशाला मोताद झालेत हे मीडियाला सांगितले होते.

ज्या फ्लॅटचा ताबा मिळावा यासाठी सिंघानिया यांनी न्यायालयात याचिका दाखल केली ते हे घर १९६० मध्ये बांधण्यात आलं होतं. १४ मजल्याची ही इमारत होती. या इमारतीचे ४ ड्युप्लेक्स कंपनीकडे सोपविण्यात आले होते. त्यानंतर २००७ मध्ये कंपनीने हे घर बांधायचे ठरवले होते. कंपनीसोबत झालेल्या करारानुसार सिंघानिया, गौतम, वीनादेवी आणि मुलं अनंत आणि अक्षयपत सिंघानिया यांना एक-एक ड्युप्लेक्स मिळणार होता. त्यासाठी त्यांना ९ हजार प्रति वर्ग फूटाची किंमत मोजावी लागणार होती. या अपार्टमेंटमध्ये हिस्सा मिळावा म्हणून वीनादेवी आणि अनंत यांनी आधीच उच्च न्यायालयात संयुक्त याचिका सादर केली आहे. तर अक्षयपतने स्वतंत्र याचिका दाखल केली आहे.

सिंघानिया यांनी संपूर्ण संपत्ती गौतम या आपल्या मुलाच्या नावे केली पण आता त्यांच्याकडे लक्ष देत नाही असे विजयपत सिंघानियांचे वकील दिनयर मेडन यांनी न्यायालयाला सांगितले आहे. सिंघानिया यांनी सर्व शेअर सुद्धा मुलाला दिले आहेत. या शेअरची किंमत १ हजार कोटींच्या जवळपास आहे. गौतमला एवढी संपत्ती देऊनही वडिलांचा सांभाळ करत नाहीत. सिंघानिया यांची कारही काढून घेण्यात आली, असं वकिलाने स्पष्ट केलं आहे. ७८ वर्षीय सिंघानिया यांनी त्यांची संपूर्ण संपत्ती मुलगा गौतम यांच्या नावे केली. पण मुलगा आता त्यांच्याकडे लक्ष देत नसल्याचं विजयपत सिंघानिया यांचे वकील दिनयर मेडन यांनी न्यायालयाला सांगितले. सिंघानिया यांनी सर्व शेअर सुद्धा मुलाला देऊन टाकले आहेत.

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.