मतदाराचे हातपाय बांधा आणि मतदान केंद्रावर घेऊन येऊन भाजप उमेदवाराला मतदान करायला लावा – भाजप मुख्यमंत्री उमेदवार येडीयुरप्पा

0
मतदाराचे हातपाय बांधा आणि मतदान केंद्रावर घेऊन येऊन भाजप उमेदवाराला मतदान करायला लावा – भाजप मुख्यमंत्री उमेदवार येडीयुरप्पा

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी भाजपा सदस्यांना विधानसभा निवडणुकीत मतदान न करणाऱ्या मतदाराला हात पाय बांधुन मतदान केंद्रावर घेऊन येऊन भाजपच्या उमेदवाराला मतदान द्यायला लावण्याचा अजब सल्ला दिला आहे.

बेळगाव जिल्ह्यातील प्रचार मोहिमेत संबोधित करताना भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार येडीयुरप्पा यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना कार्यकर्त्यांना हा उपाय सांगितल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

“आत्ता विश्रांती घेऊ नका” असे जर तुम्हाला वाटत असेल की कोणी मत देत नाही तर त्यांच्या घरी जा, हात आणि पाय बांधा आणि त्यांना महानतेश या भाजप उमेदवाराला मतदान करायला लावा, असे विधान भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार येडीयुरप्पा यांनी केले आहे.

काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी याला प्रत्युत्तर देत ट्विट केले की, कर्नाटक चे लोक भाजपला फेटाळत आहेत आणि त्यामुळेच निराशेपायी येडियुरप्पा यांनी हे विधान केले आहे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

भोसरी जमीन खरेदी प्रकरण: पुणे एसीबी ची एकनाथ खडसे यांना क्लीन चीट

गाजीपुर प्रकरण: अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी मौलवी ला अटक

LEAVE A REPLY