Pune International Marathon 2018
33rd Pune International Marathon स्पर्धा आज सकाळी पुण्यात पार पडली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अफ्रिकन खेळाडूंनी स्पर्धेत बाजी मारली आहे. इथोपियन धावपटू अटलाव डेबेड याने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. १०२ विदेशी स्पर्धक धरून जवळपास १५ हजार स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. धावपटू अटलाव डेबेड ने ४२ किलोमीटर ची फुल मॅरेथॉन स्पर्धा जिंकत पुणे मॅरेथॉन स्पर्धेवर आपले नाव कोरले.
बाबुराव सणस मैदान सारसबाग पासून पहाटे पाच वाजता या स्पर्धेला सुरुवात झाली. माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते मॅरेथॉनची सुरुवात करण्यात आली.
33rd Pune International Marathon मध्ये फुल मॅरेथॉन (मुख्य) ४२ किमी, हाफ मॅरेथॉन २१ किमी, १० किमी, ५ किमी, व्हीलचेअर या अशा विविध गटात स्पर्धा घेण्यात आली.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.