अभिजात भाषा दर्जा म्हणजे काय?
गेले अनेक वर्षे आपण मराठीला अभिजात भाषा दर्जा मिळावा अशी मागणी केल्याचे ऐकत आहोत. परंतु बऱ्याच जणांना अभिजात भाषा दर्जा म्हणजे काय हेच माहीत नाही. यासाठीच थोडक्यात माहिती मिळावी म्हणुन हा लेख.
अभिजात भाषा दर्जा मिळालेल्या भाषा
गेल्या पंधरा वर्षांत तमिळ, संस्कृत, तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि उडिया अशा भारतातील पाच राज्यभाषांना केंद्र सरकारने ‘अभिजात भाषा’ म्हणून दर्जा दिलेला आहे. हा दर्जा मराठी भाषेला सुद्धा मिळावा म्हणून मराठी भाषिक अनेक वर्षे केंद्र सरकारकडे मागणी करत आहेत.

अभिजात भाषा दर्जा म्हणजे नेमकं काय?
- ज्या भाषेतलं साहित्य श्रेष्ठ दर्जाचं ती भाषा अभिजात
- त्या भाषेला दीड ते अडीच हजार वर्षांचा इतिहास हवा
- त्या भाषेला भाषिक आणि वाडःमयीन परंपरेचे स्वयंभूपण असावे
- प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रुप यांचा गाभा कायम असावा
प्राचीनता, श्रेष्ठता, स्वयंभूपणा आणि सलगता हे ४ निकष अभिजात भाषा दर्जा देण्यासाठी पुरेसे आहेत.
अभिजात भाषा दर्जा मिळवण्यासाठीचे मराठी भाषा पुरावे
मराठीतला आज उपलब्ध असलेला पहिला ग्रंथ आहे, “गाहा सत्तसई” (गाथा सप्तसती). सातशे लोककवितांचा संग्रहांचा हा ग्रंथ आहे. पैठणच्या हाल या सातवाहन राजाने सुमारे दोन हजार वर्षांपुर्वी पन्नास कवींच्या या कविता या ग्रंथात संकलित केल्या असल्याचे पुरावे आहेत.
सातवाहनांची राजभाषा मराठी असल्याने त्यांचे जिथे जिथे राज्य होते, तिथे तिथे या ग्रंथाची हस्तलिखिते मिळालेली आहेत. सातवाहनांचे संपुर्ण भारतावर तर राज्य होते. सातवाहनांची राजवट इसवी सन पूर्व २३० पासून जवळपास ४००-४५० वर्ष होती. त्यामुळं या भाषेचं वय दोन हजार वर्षांपूर्वीचं आहे हे सिद्ध झाले आहे. मराठी ही फक्त प्राचीन भाषा आहे असं नाही तर, तिच्यात श्रेष्ठ साहित्याची सातत्यपूर्ण परंपरा आहे. म्हणूनच मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सातत्याने मागणी होत आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न होत असून लवकरच हा दर्जा मराठीला मिळावा यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करूयात.
#अभिजातमराठी
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
#ट्विटरसंमेलन : आजपासुन ट्विटर वर मराठीचा जागर
पाच दिवसाच्या बाळाला कवेत घेऊन लष्कर अधिकारी आली आपल्या पतीच्या अंत्यसंस्काराला
मस्त आहे post आवडली मला.???