मोबाईल एअरबॅग केस
जर्मनीच्या एका अभियांत्रिकी विद्यार्थ्याने ‘मोबाईल एअरबॅग’ केस डिज़ाइनचा शोध लावला आहे. ही केस फोन पडला जातो तेव्हा स्वयंचलितरित्या उघडली जाते.
सध्या आपल्याकडे आधीच बाजारात अनेक पर्याय आहेत जे मोबाइलला हानीपासून संरक्षण करू शकतात, जसे की क्रॅक, स्क्रॅप, वॉटर यांपासून संरक्षण देतात. परंतु सहसा ते आकाराने ढोबळ आणि किमतीने जास्त असतात. त्यासाठीच या जर्मन विद्यार्थ्याने मोबाईल एअरबॅग’ केस डिज़ाइनचा पर्याय समोर मांडला आहे. त्याचे हे या केस पेटंट साठी नोंदणीकृत झाले आहे. AD (Active Damping) फोन केस हे मोबाईल पडला असता केस मधील स्प्रिंग उघडली जाऊन मोबाईल ला होणारी इजा झेलू शकते.
जर्मनीतील आलेन विद्यापीठातील 25 वर्षीय फिलिप फ्रेंझेल ला त्याचा मोबाईल जॅकेट बॅनिस्टर वर ठेवताना फुटला असता मोबाईल एअरबॅग केस डिज़ाइन चा विचार त्याच्या डोक्यात आला.
जॅकेट बॅनिस्टर वर आदळल्याने हँडसेट मधील इलेक्ट्रॉनिक्स भागाला धक्का लागून मोबाईल खराब झाला होता. फ्रेंझेल ने मोबाईल आदळल्यानंतर ब्रेकिंग टाळण्यासाठी सिस्टम विकसित करणे सुरु केले. मोठ्या आकारात असण्यापेक्षा त्याला लहान आणि प्रगत असा एक केस हवा होता. तब्बल चार वर्षांनंतर, त्याने एका सर्वसाधारण रचनेचा शोध जो एका सेन्सरसह येतो जो फोन पडण्याच्या वेळी ओळखून त्यावर कृती करू शकतो.
‘मोबाईल एअरबॅग’ रचनेत असलेल्या सेन्सर्सने चार स्प्रिंग्स उघडण्याचा आदेश दिल्यानंतर जमिनीवर फोन आदळताच फोन स्प्रिंग द्वारे अधांतरी राहू शकतो. एकदा स्प्रिंग उघडली गेल्यावर सुद्धा पुन्हा ती केस मध्ये माघारी जाण्याची सुविधा दिली गेली असल्याने आपण या केस चा वापर पुन्हा करू शकतो.
ही ‘मोबाइल एअरबॅग’ किंवा AD (Active Damping) केस सध्या खरेदीसाठी उपलब्ध नाही. तथापि, फ्रेंझेल ने याचे पेटंट घेतले असून जर्मन सोसायटी ऑफ मेकाट्रोनिक्सने त्याच्या या शोधासाठी एक पुरस्कारही दिला आहे. त्याच्या या केस चा व्हिडिओ त्याने प्रसारित केला असून तुम्ही तो येथे पाहू शकता.
Active Damping Case Demonstration
व्हिडिओ प्रमाणे, AD केस फोनवर किमान वजन वाढवते, तर ड्रॉप-शॉक विरुद्ध महत्वाचे संरक्षण देते. फ्रेंझेल फंडींग घेऊन केस चे व्यावसायिकीकरण करण्यासाठी ठरविले असून तो आता या कामात गुंतला आहे.
तर तुम्हाला कशी वाटली ही केस? आम्हाला नक्की कळवा…
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
प्लॅस्टिक बंदी: पुण्यात ८००० किलो प्लॅस्टिक जप्त, ३६९००० ₹ चा दंड वसूल
Mumbai vs Pune Memes: Mumbai Pune Jokes all in one Combo Pack, Who is the Best? Pune or Mumbai