नुकसानभरपाई म्हणून या हॉस्पिटल ला मिळणार १ कोटी रुपये, कोर्टाचा निकाल

0
नुकसानभरपाई म्हणून या हॉस्पिटल ला मिळणार १ कोटी रुपये, कोर्टाचा निकाल

पुणे कोर्टाने शहरस्थित व्यावसायिकाला आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल ला मानहानीचे शुल्क म्हणून 1 कोटी रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ३,८९,७९५ रुपये थकबाकी भरण्याचे सुद्धा आदेश दिले आहेत.

न्यायाधीश एस.एम.ए. सय्यद यांनी हा निर्णय केला आहे. २०१३ मधील या केस चा निकाल आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल च्या बाजूने लागला आहे.

काय आहे प्रकरण:

पुणे स्थित व्यवसायकाला हृदयविकाराच्या आजारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ४ जानेवारी २०१३ रोजी व्यवसायिकाची एंजिओप्लास्टी करण्यात आली होती. रुग्णाने या आलेल्या बिलावर वाद घातला होता. तसेच चार काही दिवसांनी रितसर डिस्चार्ज न घेता रुग्णालय सोडले होते.
रुग्णाने एकूण उपचार शुल्क ४,२९,७९४ पैकी केवळ ४०००० रुपये भरले होते, तर त्यांच्यावर ३,८९,७९५ इतकी थकबाकी होती. यावरून रुग्णालयाने रुग्णावर केस दाखल केली होती. रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार रुग्णाने त्यांच्या रुग्णालयाची बदनामीकारक सामग्री वर्तमानपत्रात प्रसारित केली होती त्यामुळे त्यांना नुकसानभरपाई मिळावी अशी अपेक्षा होती. कोर्टाने रुग्णालयाची बाजू कायम ठेवत फक्त थकबाकी भरण्याऐवजी नुकसानभरपाई म्हणून १ कोटी रुपयांची भरपाई करण्यास रुग्णाला सांगितले आहे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

कारगिल युद्ध माहिती, कारगिल युद्ध मराठी, कारगिल युद्धाचा इतिहास, कसे झाले कारगिल युद्ध?

युद्धस्थितीत ‘महाराष्ट्र पोसणारा’ शेतकरी, शेतकऱ्यांना हमीभाव, कर्जमाफी आणि बिनव्याजी कर्ज देणारे छत्रपती !

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.