छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या कॉमेडियन कडून मनसैनिकांनी लिहून घेतला माफीनामा, स्टुडिओ फोडला

0
छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या कॉमेडियन कडून मनसैनिकांनी लिहून घेतला माफीनामा, स्टुडिओ फोडला
Spread the love

अग्रिमा जोशुआ या कॉमेडियन ने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सर्वांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. तिच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी सोशल मीडियावर अनेकांनी लावून धरली होती.

या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत अग्रिमा जोशुआ काम करत असलेल्या स्टुडिओची तोडफोड करत तिच्याकडून माफीनामा लिहून घेतला आहे.

मनसे कार्यकर्ते यश रानडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह स्टुडिओची तोडफोड करत अग्रिमा जोशुआ हिच्याकडून लेखी माफीनामा घेतला आहे. तोडफोडीनंतरचा व्हिडिओ त्यांनी स्वतःच्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विनोदामुळे अग्रिमा काम करत असलेल्या स्टुडिओची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली आहे.

नक्की काय म्हणाली होती अग्रिमा जोशुआ?

मुंबईत अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाबद्दल अग्रिमाने विनोदातून टीका केली होती. तिने शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेख करत त्यांच्याबद्दल अपमानास्पद शब्द वापरले होते त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या होत्या.

अग्रिमा आपल्या स्टॅन्डअप मध्ये म्हणाली होती की  “शिवाजी या पुतळ्याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मी गुगलवर Quora सोर्सवर गेले असता तिथे कोणीतरी निबंध लिहिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते शिवाजी पुतळ्याचा मास्टरस्ट्रोक आहे ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सत्ता येईल, दुसऱ्या एकाला वाटलं काहीतरी क्रिएटिव्हिटी कन्सेप्ट आहे, तो म्हणाला, यात जीपीएस ट्रॅकर सुद्धा असणार आहे शिवाय त्यांच्या डोळ्यात लेझर लाईट निघेल जी अरबी समुद्रातून येणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांवर नजर ठेवेल. तर तिसरा व्यक्ती येऊन सांगतो, शिवाजी नाही तर शिवाजी महाराज म्हणा, बस्स मी त्यालाच फॉलो केलं” अशा शब्दात अग्रिमाने शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर विनोद करत खिल्ली उडवल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

अग्रिमा जोशुआ माफीनामा

मनसैनिकांनी दणका दिल्यानंतर अग्रिमा जोशुआ ने लेखी मागीनामा सादर केला आहे. तिचे ट्विटर वरील खाते सुद्धा बंद झाले असून याबत संपूर्ण माहिती उपलब्ध झालेली नाही.

अग्रिमा जोशुआ माफीनामा

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Biz news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.