पुरंदर येथील प्रस्तावित पुणे इंटरनेशनल एयरपोर्ट ची परवानगी नाकारल्या नंतर आता खेड येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ बनविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या मुद्द्यावर पिंपरी चिंचवड भोसरी चे आमदार महेश लांडगे यांनी शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना उद्देशून पत्र लिहिले आहे. यावर खा. कोल्हे व माजी खा. पाटील यांनी सकारात्मक उत्तर दिले आहे.
आमदार महेश लांडगे खेड आंतरराष्ट्रीय विमानतळ बाबत अडून बसले आहेत, पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्राच्या दृष्टीने हे खूप महत्वाचे आहे.
खासदार अमोल कोल्हे यांनी उत्तर देताना नाशिक फाटा ते मोशी रस्त्याच्या कामाला गती देण्यासाठी आमदार महेश लांडगे यांचे सहकार्य मागितले आहे. खेड येथे विमानतळ व्हावे यासाठी तिन्ही नेते आग्रही दिसत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अजून याबबत कोणतीही भूमिका मांडली नाही आहे.
पुणे जिल्हा अनेक वर्षे विमानतळ होण्याची वाट पाहत आहे. त्यामुळे विकास खुंटला असे अनेक तज्ञांचे म्हणणे आहे.