पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणनीतीचा आदर्श घ्यावा: अजित डोवाल

0
पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणनीतीचा आदर्श घ्यावा: अजित डोवाल

गुरूग्राम मध्ये पोलिसांच्या कार्यक्रमात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पोलिसांना छत्रपती शिवाजी महाराज यांची रणनीती, संगठन कौशल्य आणि माणसांची पारख याविषयीची माहिती दिली. सर्वांनी शिवरायांचा आदर्श समोर ठेवायला हवा असे ते म्हणाले.

शिवाजी महाराज हे कुशल नेतृत्त्वाचे उत्तम उदाहरण आहेत. एकदा घोड्यावरुन जात असताना महाराजांनी एका व्यक्तीला दांडपट्टा फिरवून उडते पक्षी मारताना पाहिले. त्याला त्यांनी आपल्या सैन्यात सहभागी करून घेतले. प्रशिक्षण दिले. त्याचे नाव जीवा महाला होते.
जीवा महाला याच्यात काय क्षमता आहे याची पूर्ण कल्पना छत्रपती शिवाजी महाराजांना होती.

छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा प्रतापगडावर अफझल खानाला भेटायला गेले तेव्हा ते सोबत जीवा महाला यांना सोबत घेऊन गेले होते. कारण त्यांना माहीत होते की अफझल खानासोबत सय्यद बंडा होता. भेटी दरम्यान अफझल खानाने दगा केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर वार केला. चिलखत घातल्याने महाराज वाचले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखं आणि बिचवा यांचा मारा करत अफझल खानाचा कोथळा बाहेर काढला. खानाच्या आवाजाने सय्यद बंडा शामियान्यात आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर वार करण्यासाठी धावला. त्याच्या हातात तलवार होती, ती तो महाराजांवर चालवणार इतक्यात अत्यंत चपळाईने जीवा महालाने बंडावर वार केला, ज्यामुळे सय्यद बंडाचा हात खांद्यापासून तुटला. छत्रपती शिवाजी महाराजांचं नेतृत्व कौशल्य इथेच दिसून येतं. जीवा महाला काय करु शकतो याची पूर्ण कल्पना छत्रपती शिवाजी महाराजांना होती. आपल्या सहकाऱ्यांचे कौशल्य अशा प्रकारे विकसित करा की प्रत्येक पोलीस जीवा महाला यांच्यासारखा तरबेज झाला पाहिजे.” असे अजित डोवाल यांनी म्हटलं आहे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

मराठ्यांचा राजा ‘शिवा’चा जेव्हा शिवा‘जी’ होतो

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.