अजित जैन यांची बर्कशायर हॅथवे मध्ये उपाध्यक्ष पदी निवड
बर्कशायर हॅथवे एक शेअर मार्केट मधील एक नावाजलेली कंपनी, बर्कशायर हॅथवे ने नुकतेच आपल्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना बढती दिली आहे त्यात भारतीय अजित जैन आणि ग्रेगरी एबल यांना ही बढती मिळाली आहे .
हे दोघेही कंपनीची धुरा सांभाळण्यासाठी वॉरेन बफेट यांचा उत्तराधिकारी होण्यासाठी एक पाऊल मागे आहेत. अजित जैन यांचा ओडीशा मधील जन्म असुन IIT खडगपूर मध्ये इंजिनियरिंग पूर्ण केले आहे.
ग्रेगरी एबल यांना नॉन इन्शूरन्स बिझनेस ऑपरेशनसाठी बर्कशायचे उपाध्यक्ष बनवले असून जैन यांच्याकडे इन्शूरन्स ऑपरेशन विभागाच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या दोघांना बर्कशायरच्या संचालक मंडळात समाविष्ट करण्यात आले आहे.
अजित जैन यांच्याविषयी:
अजित जैन यांचा जन्म १९५१ मध्ये ओडिशात झाला त्यानंतर त्यांनी १९७२ मध्ये IIT खडगपूरमधून मेकॅनिकल इंजिनिअरींगमध्ये B.Tech ही पदवी घेतली. १९७३ ते ७६ दरम्यान त्यांनी IBM या नामांकित कंपनीमध्ये Sells विभागात काम केले. १९७६ मध्ये IBM ने भारतातील काम थांबवले. त्यामुळे जैन यांच्या नोकरीवर गदा आली. वर्ष १९७८ मध्ये ते अमेरिकेत गेले आणि हार्वर्ड विद्यापीठातून एमबीए पूर्ण करून मँकेजी अँड कंपनीत नोकरीला लागले. भारतात येऊन लग्न करून ८० च्या दशकात पुन्हा पत्नीबरोबर अमेरिकेत परतले. १९८६ मध्ये त्यांनी मँकेजी सोडून वॉरेन बफेट यांच्या बर्कशायर हॅथवे मध्ये कामावर रुजू झाले.
त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले असून त्यांना कंपनी मधील महत्वाच्या पदावर बढती मिळाली आहे. अजुन एका भारतीयाने अशा उंच शिखरावर जाण्याने भारतीयांची मान उंचावत आहे.
अजित जैन यांना भावी वाटचालीस शुभेच्छा…
©PuneriSpeaks
For more VISIT