जलसंपदा मंत्र्यांचे सरकारमध्ये काही चालत नाही, अजित पवारांनी विजय शिवतारेंवर टीका

0
जलसंपदा मंत्र्यांचे सरकारमध्ये काही चालत नाही, अजित पवारांनी विजय शिवतारेंवर टीका

सातारा : दुष्काळी भागासाठी वरदान ठरणारी जिहे-कठापूर योजना आम्ही मंजूर केली. मात्र, गेल्या तीन वर्षात पुरेसा निधी या सरकारला उपलब्ध करता येत नाहीये.

राज्याला मागे नेण्याचे काम भाजप सरकार करत असल्याची टीका राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खटाव येथील कार्यक्रमात केली.

Photo credit's

विविध विकास कामांचे उद्‌घाटन, शेतकरी मेळावा आणि जिल्हा परिषद सदस्य प्रदिप विधाते यांचा वाढदिवस कार्यकम या संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, विधानसभेतील पक्ष प्रतोद व आमदार शशिकांत शिंदे, प्रभाकर घार्गे, प्रदिप विधाते, यांच्यासह आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.

कर्जमाफीच्या नावाखाली भाजप सरकारने शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. मंत्र्यांच्या गाड्या लोक व शेतकरी का अडवायला लागलेत. दुष्काळी भागाला वरदान जिहे-कठापूर योजना आम्ही मंजूर केली. परंतु सरकारला गेल्या तीन वर्षात पुरेसा निधी उपलब्ध करता आलेला नाही. साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे जलसंपदा मंत्री आहेत. पण त्यांचे सरकार मध्ये कसलेच वजन नाही

हे कोणा येड्यागबाळ्याचे काम नाही!
जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा बॅंकेचे संचालक प्रदीप विधाते यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सपत्नीक सत्कार अजित पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी श्री. पवार यांनी विधातेंच्या कामांबद्दल गौरवोद्‌गार काढले. खटावची ग्रामपंचायत चार वेळा 17 विरूध्द शुन्य ने जिंकण्याचे रेकॉर्ड विधातेंनी
केले आहे. हे कोणा येड्यागबाळ्याचे काम नाही, असेही त्यांनी सांगितले.

Source

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.