अक्षय कुमार ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज शो’च्या चित्रीकरणादरम्यान अचानक आजारी पडला.
तो यशराज स्टुडिओमध्ये रिअॅलिटी शोचे चित्रीकरण चालु होते. त्यावेळी त्याची तब्येत अचानक बिघडली असे दिसल्यावर सेटवर डॉक्टरांना बोलावण्यात आले. अक्षयला अंगदुखीचा त्रास असून थोडा तापही आलेला होता. त्याला आराम करण्याचा सल्ला दिला होता. पण तरीही त्याने चित्रीकरण थांबवू दिले नाही. संपूर्ण चित्रीकरण पूर्ण करूनच तो घरी गेला. अक्षय नेहमीच त्याच्या प्रामाणिकपणासाठी आणि शिस्तीसाठी ओळखला जातो. तो आपल्यामुळे निर्मात्यांना नुकसान होऊ नये याची पूर्ण खबरदारी घेतो.
आजारी असतानाही अक्षय कुमार ने केले शूटिंग पूर्ण
