संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर आळंदी ला भाविकांनी भेट देण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असे पिंपरी चिंचवड पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पोलिसांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त आधीच आदेश जारी केले आहेत.
यावर्षी, कोरोना वायरस साथीच्या आजारामुळे भाविकांना तीर्थक्षेत्र आळंदी ला भेट देणे शक्य नाही. पोलिसांनी सर्व सीमा बंद केल्या असून कोणी आळंदी मध्ये येण्याचा प्रयत्न केल्यास १४ दिवस विलगिकरण करण्यात येईल असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस उपायुक्त (झोन I) स्मिता पाटील म्हणाल्या, “कोरोना रूग्ण सापडल्यानंतर मंदिरालगतचे रहिवासी क्षेत्र यापूर्वीच कंटेनमेंट झोनमध्ये रुपांतर झाले आहे. वर्षाच्या या वेळी सहसा हजारो भाविक आळंदी येथे दर्शन घेण्यासाठी येतात. यावर्षी, साथीच्या रोगामुळे आम्ही कोणालाही परवानगी देणार नाही आणि अशा प्रकारे आळंदी मध्ये येणारे-नेणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत.
भाविकांनी तरीही आळंदीच्या आत येण्याचे प्रयत्न केल्यास त्यांना मंदिरात पोहोचता येणार नाही, असा इशारा पोलिसांनी भाविकांना दिला आहे. “पोलिसांनी जूनअखेरपर्यंत लॉज बंद ठेवण्याच्या सूचना आधीच दिल्या आहेत. मंदिराच्या चारी बाजूनी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. जर कोणताही नवीन भाविक नजरेस पडल्यास त्याला विलगिकरण मध्ये ठेवण्यात येईल, असे पाटील म्हणाल्या.
मंदिरात फक्त 50 लोकांना प्रवेश देण्यात आला आहे. 50 लोकांना पास पुरवण्यात आले असून बाकी कोणालाही मंदिरात प्रवेश देण्यास मज्जाव करण्यात आला आहे. 13 जून रोजी संतश्रेष्ट ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान झाले असून पालखी मंदिरातच ठेवण्यात आली आहे.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज, टि्वटर आणि इंस्टाग्राम, टेलिग्राम वर भेट द्या.