पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्र आजपासून रात्री १२ वाजेपासून प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड आणि पिंपरी चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संपूर्ण पुणे व पिंपरी चिंचवड च्या हद्द प्रतिबंधित (सील) करण्याचे चे आदेश दिले आहेत.
याआधी पुण्यातील काही भाग प्रतिबंधात्मक क्षेत्र म्ह्णून घोषित करून त्या भागातील संपूर्ण रहदारी थांबवण्यात आली होती. अत्यावश्यक सेवा वगळता बाकी कोणालाही या क्षेत्रात संचाराची परवानगी नव्हती. सकाळी थोडा वेळ अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्याची परवानगी होती. आता संपूर्ण पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिका क्षेत्र मध्ये कडक संचारबंदी चे आदेश देण्यात आले आहेत. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता पाहता हे आदेश देण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवांना यातून वगळले आले. अत्यावश्यक सेवांसाठी ठराविक वेळ देण्यात आला आहे.



हा आदेश आज रात्री १२ वाजेपासून २७ एप्रिल पर्यंत लागू राहणार आहे. त्यानंतर पुढील धोरण ठरवले जाणार आहे. १८ एप्रिल रोजी अजित पवार यांनी याबाबतची सूचना दिल्या होत्या.
प्रतिबंधात्मक क्षेत्र नियम
- शहराच्या सीमा बंद राहणार, १९ एप्रिल ते २७ एप्रिल पर्यंत आदेश लागू
- पोलिसांकडून दिलेले अंतर्गत प्रवासाचे पास २२ तारखेपर्यंत ग्राह्य, पुढील पास महापालिकेकडून दिले जाणार
- बँक सकाळी १० ते दुपारी २ पर्यंतच सुरु राहणार, ATM सुरु राहणार
- अत्यावश्यक सेवा जसेकी फळे, दूध, भाजीपाला विक्री सकाळी १० ते २ अशी राहणार
- मांस विक्री सकाळी १० ते २ पर्यन्त सुरु राहणार
- दवाखाने आणि मेडिकल सुरु राहणार
- घरपोच अन्न आणि औषधे सकाळी ८ ते १० या वेळेतच सुरु राहणार, त्यासाठी विशेष पास पालिकेकडून घ्यावा लागणार
- अत्यावश्यक सेवा जसेकी पोलीस, राज्य आणि केंद्रीय विभाग कर्मचारी, महापालिका अधिकारी यांना यातुन वगळण्यात आले आहे.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.