५ लाखांच्या आतील हॅचबॅक कार खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक गोड बातमी आहे. सर्व कंपन्यांनी वर्षअखेर सेल मध्ये मोठमोठे डिस्काउंट जाहीर केले आहेत.
मारुती अल्टो आणि एस-प्रेसो या गाड्या सर्वात जास्त खपल्या जाणाऱ्या गाड्यांमध्ये वरच्या स्थानावर आहेत. अल्टो अजूनही भारतातील सर्वाधिक विक्री करणार्या मोटार कार मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. रेनो क्विडचीही मागणी वाढत आहे कारण यात मारुती कारपेक्षा अनेक वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. रेडी-गो सुद्धा यात मागे नसून सर्वाधिक स्वस्त गाडी म्हणून याचे मॉडेल लोकप्रिय आहे. जर आपण या डिसेंबरमध्ये ५ लाखांच्या आतील गाडी खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर, या वर्षाच्या अखेरीस आपल्याला मोठमोठे डिस्काउंट मिळणार आहेत.
कोणत्या गाडीवर आहेत किती डिस्काउंट, जाणून घ्या
१. मारुती अल्टो

Offers | Amount |
Cash Discount | Up to Rs 15,000 |
Exchange Bonus | Rs 15,000 |
Corporate Benefits | Up to Rs 6,000 |
Additional Offers | – |
Total | Up to Rs 36,000 |
मारुती अल्टो ची किंमत २.९४ लाख रुपयांवरून ४.३६ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
२. मारुती एस-प्रेसो

Offers | Amount |
Cash Discount | Up to Rs 25,000 |
Exchange Bonus | Rs 20,000 |
Corporate Benefits | Up to Rs 6,000 |
Additional Offers | – |
Total | Up to Rs 51,000 |
मारुती एस-प्रेसोची किंमत ३.७० लाख ते ५.१३ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
३. रेनो क्विड

Offers | Amount |
Cash Discount | Rs 15,000/Rs 20,000 |
Exchange Bonus | Up to Rs 15,000 |
Corporate Benefits/ Rural Discount | Up to Rs 9,000/ 5,000 |
Additional Offers | Up to Rs 10,000 |
Total | Up to Rs 54,000 |
रेनो क्विडची किंमत ३ लाख ते ५.१३ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
४. डॅटसन रेडी-गो

Offers | Amount |
Cash Discount | Up to Rs 9,000 |
Exchange Bonus | Up to Rs 20,000 |
Corporate Benefits/ Rural Discount | Rs 5,000 |
Additional Offers | Up to Rs 11,000 |
Total | Up to Rs 45,000 |
डॅटसन रेडी-गो ची किंमत २.८३ लाख रुपयांपासून ते ४.७७ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
PuneriSpeaks is now on Telegram. Click here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.
अजुन वाचण्यासाठी:
- डॉ. शीतल आमटे यांच्याविषयी माहिती, कोण होत्या शीतल आमटे
- Pune: वाढदिवसाला धिंगाणा घालणे पडले महागात! बर्थडे बॉय वर अंडे फोडणाऱ्यांवर गुन्हा दाखल