अमेझॉन आणि फ्लिपकार्टचा दिवाळी बंपर सेल

0
अमेझॉन आणि फ्लिपकार्टचा दिवाळी बंपर सेल

आजपासून फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर पुन्हा एकदा दिवाळीचा बंपर सेल सुरु होणार आहे. फ्लिपकार्टवरचा हा दिवाळीचा पहिलाच सेल आहे. तर अमोझॉनचा पहिला सेल नुकताच 8 तारखेला संपला होता, त्यामुळे अमेझॉन पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी नवा सेल घेऊन आला आहे.

Click on Image:

हे दोन्ही सेल 14 ते 17 ऑक्टोबर दरम्यान सुरु असणार आहेत. या दोन्ही सेलमध्ये मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर भरघोस सूट दिली जाणार आहे. त्यामुळे आधीच्या सेलची तारीख हुकलेल्या ग्राहकांसाठी आता पुन्हा एकदा खरेदीची संधी उपलब्ध झाली आहे.

Click On Image:

 

फ्लिपकार्ट बिग दिवाली सेल फ्लिपकार्टने बिग दिवाली सेलची तारीख जाहीर केली आहे. 14 ते 17 ऑक्टोबर दरम्यान या सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. या सेलमध्ये मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि टीव्हीवर भरघोस सूट देण्यात येणार आहे.

 

या फोनवर सूट मिळणार वेगवेगळ्या प्रकारांमध्ये टॉप 3 फोनची निवड करण्यात येणार आहे. रेडमी नोट 4, लेनोव्हो K8 प्लस आणि शाओमी रेडमी नोट 4 हे फोन ग्राहकांनी दिलेल्या प्रतिसादानुसार टॉप 3 फोनमध्ये असतील.

स्वस्त फोनमध्ये मोटो सी प्लस, मोटो ई 4 प्लस आणि सॅमसंग गॅलक्सी J7-6 हे फोन आहेत. तर टॉप 3 प्रीमिअम स्मार्टफोनमध्ये आयफोन 6, आयफोन 7 आणि सॅमसंग गॅलक्सी एस 7 या फोनचा समावेश आहे.

फ्लॅश सेलमध्ये काय मिळणार? सेलच्या काळात दररोज दुपारी 12 वाजता फ्लॅश सेलचं आयोजन करण्यात येणार आहे. पहिला सेल पॅनासॉनिक एल्युगा रे X चा असेल, जो 2 हजार रुपयांनी स्वस्त म्हणजे 6 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. 14 ऑक्टोबरला ऑनर 9i चा पहिला सेल असेल. शिवाय एक्स्चेंज ऑफरमध्ये रेड मी नोट 3, सॅमसंग गॅलक्सी J7, मोटो G3, लेनोव्हो K4 नोट आणि आयफोन 5s फोनच्या बदल्यात जास्तीची सूट देण्यात येणार आहे.

फॅशन वर ही मोठी सूट : 

फ्लिपकार्ट वर ही खास ऑफर्स :

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.