अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक प्रक्रिया अतिशय किचकट असल्याने लवकर समजत नाही. यावर्षीच अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक असल्याने या प्रक्रियेला सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा हा प्रयत्न
अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक
अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक झाल्यानंतर निवडून आलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला सामान्य भाषेत पोटस
POTUS (President Of The United States) असे म्हणतात.
अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा तीनही सैन्यदलांचा प्रमुख असतो त्याबरोबरच संपूर्ण एक्झिक्यूटिव्ह बॉडीचा देखील प्रमुख असतो. आपल्याकडे राष्ट्रपती तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख असतात. सामान्यपणे आपल्याला वाटत असते की अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा जनतेतून निवडला जातो परंतु हे सत्य नाही. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा InDirect पद्धतीनेच निवडला जातो.
आता आपण क्रमवार या पद्धतीला समजून घेण्याचा प्रयत्न करूया. अमेरिका मध्ये आपल्या संसदेप्रमाणे काँग्रेस (Congress) आहे. त्याची दोन महत्वाची सभागृहे आहेत.
१) कनिष्ठ सभागृह (HOR) २) वरिष्ठ सभागृह (Senate)
America Congress
१) कनिष्ठ सभागृह House Of Representatives (HOR): ४३५ + ६ (सहा जणांना मतदानाचा अधिकार नसतो)
२) वरिष्ठ सभागृह Senate : १०० (५० राज्यातून प्रत्येकी दोन)
पण या दोन्ही सभागृहांचा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणताही सहभाग नसतो.
फक्त निवडणूक संपल्यानंतर दोन्ही सभागृहांमध्ये ऑफिशियल घोषणा केली जाते की अमुक व्यक्ती राष्ट्राध्यक्ष झाली आहे. याशिवाय या दोन्ही सभागृहांचा निवडणुकीत कसलाही संबंध नसतो.
अमेरिका राष्ट्राध्यक्ष होण्याची पात्रता
१) निवडणूक लढणारी व्यक्ती ३५ वर्षे पूर्ण केलेली असावी.
२) ती जन्मता अमेरिकन असावी.
३) किमान अमेरिकेमध्ये १४ वर्षांपासून वास्तव्य असाव.
या निकषांना पूर्ण करणारी व्यक्ती अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक साठी पात्र ठरते.
राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाल हा चार वर्षांचा असतो. एक व्यक्ती फक्त दोनदाच राष्ट्राध्यक्ष होऊ शकते. १९५१ आधी ही अट नव्हती. १९५१ च्या घटनादुरुस्तीने प्रत्येक व्यक्तीला फक्त दोनदाच राष्ट्राध्यक्ष होता येते.
राष्ट्राध्यक्षपदाची प्रक्रिया
१) Primaries and Caucus
२) National Convention (उमेदवार घोषणा) ३) General Election/Electoral College ४) Declaration
५) Inauguration

आता आपण व्यवस्थितपणे या प्रक्रियेला समजून घेऊ शकतो. अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक प्रक्रिया एक ते दीड वर्षां अगोदरच सुरू होत असते.
अमेरिकेत प्रामुख्याने दोन पक्ष आहेत रिपब्लिकन पार्टी आणि डेमोक्रेटिक पार्टी.
आपल्या सर्वांचा समज आहे की अमेरिकेत द्विपक्ष पद्धती आहे तर असे नसून अमेरिकेत दुसरे पक्ष देखील आहेत जसे की
-
- Tea Party
- Green Party
- Libertarian Party
- Independents ( अपक्ष )
मात्र प्रामुख्याने रिपब्लिकन पार्टी आणि डेमोक्रेटिक पार्टी या दोन्ही पक्षांमध्ये १९५१ पासून (अब्राहम लिंकन राष्ट्राध्यक्ष असताना) प्रामुख्याने लढत होत आली आहे. इतर पक्ष नाममात्र आहेत.
डेमोक्रॅटिक पार्टी माहिती

डेमोक्रॅटिक पार्टी जी विचारांनी लिबरल आहे. ही पार्टी गरिबांच्या हिताची आहे अशी सर्वसामान्य धारणा अमेरिकेच्या जनतेत आहे.
यांचा निवडणूक चिन्ह गाढव असून निळा रंग प्रामुख्याने डेमोक्रॅटसना दर्शवतो.
डेमॉक्रॅटिक पार्टीकडून राष्ट्राध्यक्ष झालेले बराक ओबामा, बिल क्लिंटन.
रिपब्लिकन पार्टी माहिती
रिपब्लिकन पार्टी ला (GOP- Grand Old Party) असेदेखील म्हटले जाते.
प्रामुख्याने हा पक्ष काँझर्व्हेटिव्ह असून परंपरागत विचारांचा म्हणून ओळखला जातो. अतिश्रीमंत लोक या पक्षाचा आधार आहेत अशी धारणा सर्वसामान्य जनतेत आहे.
यांचा निवडणूक चिन्ह हत्ती असून लाल रंग रिपब्लिकन्सना दर्शवतो.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक मुख्यता दोन महत्त्वाच्या टप्प्यांत होत असते.
एक पक्षांतर्गत उमेदवार निवडणे त्यानंतर दोन्ही पक्षांच्या अधिकृत उमेदवारांमधून राष्ट्राध्यक्ष निवडणे.
आता राष्ट्राध्यक्षपदाची प्रक्रिया सुरू होते ती इच्छुक उमेदवार आपलीे दावेदारी करण्यापासून.
१) Primaries and Caucuses
रिपब्लिकन पार्टी आणि डेमॉक्रॅटिक पार्टी मधून इच्छुक उमेदवारांनी आपली दावेदारी केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीची घोडदौड सुरू होते.

आता रिपब्लिकन पक्ष सत्तेत असून डोनाल्ड ट्रम्प हेच त्यांचे अधिकृत उमेदवार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्ष प्रायमरी किंवा कॉकस न घेता डोनाल्ड ट्रम्प यांना अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करू शकतो.
२०१२ च्या निवडणुकीत जसे बराक ओबामांवर विश्वास दाखवत डेमोक्रॅटिक पार्टी ने त्यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली होती तशीच.
मात्र डोनाल्ड ट्रम्प यांना टक्कर देण्यासाठी डेमोक्रॅटिक पार्टी कडून अधिकृत उमेदवार निवडण्यासाठी प्रायमरी किंवा कॉकसेस ही प्रक्रिया आता पार पाडली जात आहे.
या प्रक्रियेतून जो जिंकेल तो डेमॉक्रेटिक पार्टीचा अधिकृत उमेदवार असेल व त्याची थेट लढत डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी होईल.
प्रायमरी किंवा कॉकसेस म्हणजे नेमकं काय? What are the Primaries and Caucuses?

अमेरिकेच्या प्रत्येक राज्यामध्ये डेमोक्रॅटिक पार्टीचे सभासद असतात ती लोक प्रायमरी किंवा कॉकसमध्ये मतदान करतात व Delegates निवडतात.
पुढे हेच डेलीगेट्स National Convention मध्ये (मोठ्या सभेत) पक्षाच्या अधिकृत उमेदवाराची निवड करतात. अमेरिकेच्या प्रत्येक राज्यामध्ये एक तर प्रायमरी द्वारे किंवा कॉकस द्वारे डेलीगेट निवडले जातात.
Primary’s: या प्रक्रियेत सभासद मतदानाद्वारे डेलीगेट निवडतात.
Caucus: या प्रक्रियेत सभासद खुल्या पद्धतीने हात उंचावतात व डेलिगेट्सची निवड करतात.
या प्रक्रिया अतिशय किचकट असतात. प्रत्येक राज्यात वेगवेगळी प्रक्रिया घेतली जाते जसे की आयोवामध्ये (Iowa) कॉकस घेतलं जातं तर साऊथ कॅरोलीना, न्यू हॅम्पशायर सारख्या राज्यांमध्ये प्रायमरी द्वारे डेलीगेट ची निवड केली जाते.
डेलीगेट जिंकण्यासाठी उमेदवार TV Debate मध्ये भाग घेतात व आपली धोरणे जनतेसमोर मांडतात.
Super Tuesday
दहापेक्षा जास्त राज्यांमध्ये एकाच दिवशी निवडणूक असल्यास असल्यास तिला सुपर ट्यूसडे म्हणतात.
यावर्षीचा सुपर ट्युसडे तीन मार्चला आहे.
प्रायमरीज आणि कॉकसेस ही फेब्रुवारीपासून सुरू होत असतात आणि जून पर्यंत चालतात.
जून पर्यंत प्रत्येक राज्यातून जिंकलेल्या डेलीगेट च्या संख्येवरून सर्वसामान्यपणे अंदाज येतो की कोण पक्षाचा प्रमुख उमेदवार म्हणून घोषित होणार आहे.
२) National Convention
जुलैमध्ये नॅशनल कन्व्हेन्शन (डिलीगेट्सची सभा) घेतली जाते. यात उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाते.

पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून निरनिराळ्या राज्यांमध्ये राष्ट्राध्यक्ष उमेदवार कॅम्पेन द्वारे प्रचाराला सुरुवात करतात.
साधारणतः जुलै ते ऑक्टोबर महिन्यामध्ये प्रचार केला जातो त्यानंतर रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमुख उमेदवारांमध्ये 3 TV Debates घेतल्या जातात. या टीव्ही डिबेट्सना जगभरातून लाखो लोक पाहत असतात. आपली धोरणे, आपली परराष्ट्र धोरणे जनतेसमोर मांडणे व आपण समोरच्या उमेदवारापेक्षा कसे योग्य आहोत हे सिद्ध करणे हा या मागील उद्देश असतो.
भारतीयांच्या मनात सर्वसाधारण समज आहे की अमेरिकेमध्ये जनता थेटपणे राष्ट्राध्यक्षांची निवड करते हा निव्वळ गैरसमज आहे.
३) अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक General Election

मागे सांगितल्याप्रमाणे पक्षांतर्गत उमेदवार निवडण्याच्या जटिल प्रक्रियेपेक्षाही ही प्रक्रिया अवघड आणि गमतीशीर आहे.
अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक साठी प्रमुख उमेदवार घोषित झाल्यानंतर ‘जनरल इलेक्शन’साठी घोडदौड सुरू होते. जनता थेटपणे राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांना मतदान न करता ‘इलेक्टरची’ निवड करते.
अमेरिका राष्ट्राध्यक्ष ची निवड जनतेने निवडून दिलेल्या इलेक्टरच्याद्वारे केली जाते तिला ‘Electoral College’ ‘प्रतिनिधी मंडळ’ असे म्हटले जाते.
प्रतिनिधी मंडळाचे काम फक्त राष्ट्राध्यक्षांची नेमणूक करण्यापर्यंत सीमित असते. त्यानंतर अमेरिकेच्या राजकारणात या प्रतिनिधी मंडळाला कोणतेही स्थान नसते. या इलेक्टोरल कॉलेजची किंवा प्रतिनिधी मंडळाची स्थापना करण्याची गरज का पडली? हा प्रश्न सर्वांना पडतो अमेरिकेची जनतादेखील थेटपणे राष्ट्राध्यक्षांची निवड करू शकली असती, मग या इलेक्टोरल कॉलेजची गरज कशासाठी हे जाणून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात जावे लागेल.
Why the US uses Electoral College?
१) अमेरिकेच्या संविधानाची निर्मिती करणाऱ्या थॉमस जेफरसन सारख्या लोकांना भीती होती की अमेरिकेतील मोठी राज्ये आपल्या लोकसंख्येच्या बळावर स्वतःचे राष्ट्राध्यक्ष सहजपणे निवडून आणू शकतील त्याला रोखण्यासाठीच इलेक्टोरल कॉलेजची तरतूद त्यांना करावी लागली.
२) अमेरिकेसारख्या संघराज्यात 50 छोटी-मोठी राज्य आहेत. ती आकाराने, लोकसंख्येने, संस्कृतीने एकमेकांपेक्षा भिन्न आहेत. त्यामुळे या सर्वांना एकत्रित बांधून ठेवण्यासाठी आणि निवडणुकांमध्ये राज्यांचे महत्त्व वाढवण्यासाठी Electoral College ची स्थापना केली गेली.
३) Congress आणि Senate यांचा प्रभाव राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीवर होऊ नये यासाठीदेखील इलेक्टोरल कॉलेजची स्थापना केली गेली.
मात्र आजच्या परिस्थितीत ही पद्धत सदोष आहे. यात अनेक उणिवा असल्याने ती बदलण्याच्या मुद्द्यावरच अनेक उमेदवार निवडणुकीत उतरले आहेत हे देखील सत्य आहे.
Electoral College Cons
अमेरिकेत प्रत्येक राज्यातून ठराविक संख्येने इलेक्टरची निवड केली जाते. एकूण अमेरिकेत ‘५७६’ इलेक्टर निवडले जातात त्यातून ‘२७०’ इलेक्टरस म्हणजे साधारण बहुमत मिळवणारा राष्ट्राध्यक्ष होतो.

दोन्ही पक्ष आपल्या आपापल्या इलेक्टर उमेदवारांची घोषणा करतात समजा
A= रिपब्लिकन आणि B= डेमोक्रॅटिक असेल तर मतदाराने A ला दिलेला मत रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराला दिला असा समजला जातो.
मात्र इथे तो विनर टेक्स ऑल मेथड…
WINNER TAKES ALL
उदाहरणार्थ, कॅलिफोर्नियामध्ये ५५ इलेक्टरस आहेत त्यापैकी २८ रिपब्लिकन पक्षाने जिंकले असतील आणि २७ डेमोक्रॅटिक पक्षाने जिंकले असतील पण एका इलेक्टरने रिपब्लिकन जास्त असल्याने संपूर्ण ५५ इलेक्टर आणि कॅलिफोर्निया राज्य रिपब्लिकन पक्षाच्या नावावर जमा होतो.
या पद्धतीमुळे जिंकलेले सर्व इलेक्टरस इलेक्टोरल कॉलेजमध्ये जातीलच असे नाही त्यामुळे एका राज्यातून कोणत्याही परिस्थितीत सर्वाधिक इलेक्टर जिंकणं गरजेचं असतं.
आणखी एक उदा., Texas: Total ३८ जर Demcrats २२ Replicans १६
तर Total ३८= Democrats कडे आणि Texas निळ्या रंगाचा होतो.
सर्वांच्या मनात आणखीन एक प्रश्न निर्माण झाला असेल कॅलिफोर्नियामध्ये ५५ टेक्ससमधे ३८ अशी प्रतिनिधींची (इलेक्टरची) संख्या कशावरून निर्धारित केले जाते?
उत्तर: काँग्रेस, सिनेटमध्ये एका राज्यातून किती प्रतिनिधी निवडून जातात यावरून आणि लोकसंख्येच्या प्रमाणात ही संख्या निर्धारित केले जाते.
मात्र लोकसंख्येच्या प्रमाणाच्या तंतोतंत पालन प्रत्येक ठिकाणी केलं जात नाही. उदाहरणार्थ., Voyoming- ‘३’ लोकसंख्या नुसार हे सर्वात छोटे राज्ये आहे, तर California- ‘५५’ लोकसंख्येनुसार सर्वात मोठे राज्य आहे.
लोकसंख्येनुसार पाहिल्यास ६८ टक्क्यांनी जास्त प्रतिनिधींची संख्या असायला पाहिजे,
मात्र कॅलिफोर्नियाला फक्त २८ टक्क्यांनी जास्त प्रतिनिधींची संख्या मिळाली.
या प्रक्रियेची आणखीन काही सदोष रूपे पाहू.
२०००: डेमॉक्रेटिक पक्षाचे उमेदवार अल गोर यांना रिपब्लिकन उमेदवार जॉर्ज बुश यांच्यापेक्षा ५ लाख अधिक मते मिळाली होती परंतु बुश यांचा विजय झाला.
कारण बुश यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर इलेक्टोरल कॉलेज देण्यात आले आणि त्यांचा विजय झाला. अल गोर यांना जरी संपूर्ण अमेरिकन जनतेने अधिक मतदान केलेले असले तरी बुश हे सर्वाधिक राज्यांतील इलेक्टर्स जिंकण्यात यशस्वी झाले होते.
२०१६: हिलरी क्लिंटन यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा तीन लाख मध्ये जास्त पडली होती आणि 7 टक्क्यांनी त्या आघाडीवर होत्या तरीदेखील इलेक्ट्रॉल कॉलेजमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाल्याने ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाले.

आता इलेक्टोरल कॉलेज समजलेला असल्याने आपण पुढची माहिती घेऊ.
अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक दिवस

नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवार नंतरच्या येणाऱ्या मंगळवारी अमेरिकेची निवडणूक होत असते. अमेरिकन जनतेच्या मतपत्रिकेवर पसंती असलेला पक्ष आधीच दर्शवलेला असतो मात्र मतदान करताना मतदाता कोणालाही मत करू शकतो.
मतदान संपल्या संपल्या निवडणूक निकाल येण्यास सुरुवात होते.
?
Swing States?काही राज्ये ठरवलेल्या प्रमाणे एका पक्षाकडे परंपरागतरित्या झुकलेल्या आहेत.उदाहरणर्था.,टेक्सास राज्यामध्ये नेहमी रिपब्लिकन पक्षाचा विजय होतो तर कॅलिफोर्निया सारख्या राज्यांमध्ये डेमोक्रॅटिक पक्ष जिंकलेला असतो.
तर काही राज्य नेहमी मी बदलत असतात त्यांना ‘
Swing States‘ म्हणतात.
ज्या राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्ष जिंकतो त्यांना ‘
RED STATES‘ म्हणतात
.
ज्या राज्यांमध्ये डेमोक्रॅटिक पक्ष जिंकतो त्यांना ‘
BLUE STATES‘ म्हणतात.
अशाप्रकारे सर्व राज्ये लाल आणि निळ्या रंगात दर्शवली जातात व बदलत असणाऱ्या स्विंग स्टेट्स मध्येे उमेदवारांचे मुख्य लक्ष असते.
४) अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक Declaration
निकालाची घोषणा लगेच केली जात नाही जिंकून आलेल्या सर्व प्रतिनिधींची प्रतिनिधी सभा डिसेंबर महिन्यामध्ये भरते त्यामध्ये राष्ट्राध्यक्षांची निवड केली जाते नंतर दोन्ही सभागृहांमध्ये निकालांची घोषणा केली जाते.
५) Inauguration
१९ जानेवारीला नवे राष्ट्राध्यक्ष शपथ घेतात त्या प्रक्रियेला Inauguration असे म्हणतात.

सगळ्यांना प्रश्न पडतो की निकाल नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागलेला असेल तर शपथविधी उशिरा का होते? कारण सुरुवातीला अमेरिकेत दळणवळण व्यवस्था नव्हती.
त्यामुळे सर्व मतपेट्या एकत्र होण्यास वेळ लागत होता म्हणून निकालापासून दोन महिन्यानंतर शपथविधी होते.
अशाप्रकारे दोन वर्षांपासून सुरू असलेली
अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणुक प्रक्रिया एकदाची संपते.
लेखक: प्रथमेश पुरुड
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या
फेसबुक पेजला,
टि्वटरवर आणि
इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी: