अमित शाह यांनी बोलता बोलता येडीयुरप्पा सरकारलाच बोलले सर्वात भ्रष्टाचारी, आपल्याच मुख्यमंत्री उमेदवारावर केली टीका

0
अमित शाह यांनी बोलता बोलता येडीयुरप्पा सरकारलाच बोलले सर्वात भ्रष्टाचारी, आपल्याच मुख्यमंत्री उमेदवारावर केली टीका

भाजपाचे अध्यक्ष अमित शाह म्हणाले की, जर कोणत्या सरकारला भ्रष्टाचाराचा पुरस्कार मिळाला तर ते कर्नाटकातील सत्ताधारी येडीयुरप्पा सरकारला मिळायला पाहिजे.

अमित शाह पत्रकार परिषदेत बोलताना जीभ घसरल्याने आपल्याच उमेदवारावर त्यांनी टीका केली. शेजारी बसलेल्याने त्यांना त्यांची चुक दाखवून दिल्यानंतर त्यांनी नाव बदलत सिद्धरमैय्या यांचे नाव घेतले. परंतु काँग्रेस ने त्यांच्या या विधानाचा समाचार घेताना ‘अमित शाह हे मनातले बोलले आहेत’ अशी टीका केली.

Amit Shah Comment Watch Here:

येडीयुरप्पा कर्नाटक राज्यात आगामी निवडणुकीत भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत आणि या जीभ घसरण्याच्या वेळी ते तिथेच बसले होते.

निवडणूक आयोगाने कर्नाटक निवडणुकीची तारीख जाहीर केल्यावर शाह पत्रकार परिषदेत बोलत होता. कर्नाटक 12 मे रोजी निवडणुका होणार आहे आणि 15 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. कर्नाटकात कॉंग्रेस पक्ष सत्ता टिकवायचा प्रयत्न करत आहे, तर भाजपा दक्षिणेकडील राज्यांत प्रबळ दावेदार म्हणून प्रयत्न करीत आहे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

केंब्रिज अॅनालिटिका प्रकरण: फेसबुक माहिती चोरी प्रकरणी फेसबुक ला मोठे नुकसान, काय आहे प्रकरण? सविस्तर

Twitterati cracks jokes on #FacebookDown as Facebook went down in India

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.