पंतप्रधान नरेंद्र मोदी देशासाठी काहीही करणार नाहीत, ते देशाला उद्ध्वस्त करतील, अमित शहांच्या भाषांतरकाराची मुक्ताफळे

0
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशासाठी काहीही करणार नाहीत, ते देशाला उद्ध्वस्त करतील, अमित शहांच्या भाषांतरकाराची मुक्ताफळे

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशासाठी काहीही करणार नाहीत, ते देशाला उद्ध्वस्त करतील, अमित शहांच्या भाषांतरकाराची मुक्ताफळे

भाजपाच्या हिंदीतून कन्नडमध्ये भाषांतर करणा-या व्यक्तीनं अमित शाहांना चांगलेच अडचणीत आणलं आहे.

दोन दिवसांपूर्वीच सिद्धरामय्या सरकारवर टीकेची झोड उठवतानाच चुकून येडियुरप्पा सरकारवर अमित शाहांनी टीका केली होती. भ्रष्टाचारासाठी जर कुठल्या सरकारला बक्षीस द्यायची वेळ आलीच, तर त्यासाठी येडियुरप्पा सरकार पात्र असे, असे चुकून अमित शाह बोलून गेले होते. परत नवीन वादाला तोंड देत भाजपा खासदार प्रल्हाद जोशी यांनी अमित शाह यांचं भाषण भाषांतरित करून टीकेचे धनी झाले आहेत. येडियुरप्पा आणि मोदी मिळून देशाला प्रगतिपथावर नेतील, असं अमित शाह म्हणाले असता. भाषांतरकार प्रल्हाद जोशी नी त्याचं काही तरी वेगळेच भाषांतर करून ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी गरीब, दलित आणि मागास वर्गासाठी काहीही करणार नाहीत. ते देशाला उद्ध्वस्त करतील. तुम्ही त्यांना मतदान करू नका’, असे भाषांतर प्रल्हाद जोशी यांनी करत नवीन वादाला तोंड फोडले आहे.

उत्तर भारतीय भाजपा नेत्यांना दक्षिण भारतात प्रचार करण्यासाठी अनेकदा हिंदी भाषिक नेत्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. कर्नाटकातील बहुतेक लोकांना हिंदी भाषा समजत नसल्यानं ब-याचदा अमित शाह यांचं हिंदीतील भाषण केंद्रीय मंत्री अनंत हेगडे कन्नडमध्ये भाषांतरित करत असतात. तर काही ठिकाणी भाषांतराचे काम प्रल्हाद जोशी करतात.

भाजपा भाषांतरासाठी नेते आणि ट्रान्सलेटर यांची मदत घेत आहेत. त्यामुळेच अशा चुका होतात असे स्पष्टीकरण भाजपाकडून देण्यात आले आहे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

अमित शाह यांनी बोलता बोलता येडीयुरप्पा सरकारलाच बोलले सर्वात भ्रष्टाचारी, आपल्याच मुख्यमंत्री उमेदवारावर केली टीका

केंब्रिज अॅनालिटिका प्रकरण: फेसबुक माहिती चोरी प्रकरणी फेसबुक ला मोठे नुकसान, काय आहे प्रकरण? सविस्तर

Twitterati cracks jokes on #FacebookDown as Facebook went down in India

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.