पुण्यातुनच गणपतीची आवड निर्माण झाली- अमृता

0
पुण्यातुनच गणपतीची आवड निर्माण झाली- अमृता

पुणे म्हणजे सार्वजनिक गणपती स्थापनेचे प्रतीक, घरोघरी गणपती, सार्वजनिक गणपती मंडळ असा धुमधाम 11 दिवस चालुच असतो.

मराठी सिनेअभिनेत्री अमृता खानविलकर हिने आपली लहानपणाची आठवण नुकतीच सांगितली.
आपला आवडता सण कोणता म्हणल्यावर अर्धे लोक गणेशोत्सव म्हणणार हे नक्कीच, अमृताला सुद्धा गणेशोत्सव खूप आवडतो. तिला तिच्या लहानपणाच्या गणपतीच्या आठवणी अजूनही आठवतात.

लहानपणी जेव्हा अमृता सर्व परिवारासहित पुण्यात राहायला आली तेव्हा तिला गणपती उत्सवाची अवाढव्य परंपरा लक्षात आली. घरोघरी गणपती, सार्वजनिक गणपती अशी धुमधाम सगळीकडे होती. त्यात अमृताला सुद्धा वाटे की आपल्या घरी गणपती आणावा पण घरच्यांच्या विरोधापायी ते शक्य झाले नाही. पण थांबेल ती अमृता कसली, ती जवळच्या सार्वजनिक मंडळाच्या गणपती उत्सवात भाग घेऊ लागली. तेथील प्रत्येक स्पर्धेत भाग घेणे तिची आवडच.

आयुष्यातील पहिला रंगभूमीवरील खेळ म्हणजे नाच हा तिने ह्याच गणपतीच्या कार्यक्रमात केला. लाकडी स्टेज आणि लाल चादर यावर नाचत माधुरी दीक्षित च्या “अखिया मिलाओ कभी अखिया चुराओ” तिने आपला पहिलावहिला परफॉर्मन्स दिला. सगळ्यांनी तिचे अफाट कौतुक देखील केले. यानंतर तिला सगळे MD MD (माधुरी दीक्षित) म्हणू लागले. सर्वजण तिच्या आईवडिलांपाशी तिचे कौतुक करू लागले. तिच्या कार्यकाळाची खरी सुरुवात याच रंगभूमीवरून झाली.

लाजाळू अमृताला गणपती स्टेज वर नाचताना कोणती ऊर्जा मिळाली काय ठाऊक अशी ती स्वतः आज सांगते. गणपतीचा आशीर्वाद नेहमीच तिच्या पाठीमागे आहे असे तिला वाटते. जेव्हा जेव्हा मी पडले तेव्हा तेव्हा त्याने मला उठण्याचं बळ दिलं. जेव्हा जेव्हा मी थांबले तेव्हा तेव्हा त्याने मला पुन्हा नव्याने सुरुवात कर असं सांगितलं. त्याच्या साथीनेच माझा हा प्रवास अजूनही चालूच आहे.

लग्नानंतर मात्र तिची इच्छा सासरवाल्यांनी पूर्ण केली आणि घरात गणपती आणला, ती म्हणते की प्रामाणिकपणे आपले काम केले की गणपती प्रसन्न होतोच.

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.