अभिनेता अर्जुन कपूर सध्या पानिपत: द ग्रेट बिट्रेयल या आगामी चित्रपटांच्या तयारीमध्ये व्यग्र असून तो चक्क मराठीचे धडे गिरवत आहे. यावर्षी तो ‘नमस्ते इंग्लंड’ आणि ‘पानिपत: द ग्रेट बिट्रेयल’ या दोन्ही चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे.
त्याचे हे करिअरमधलं सर्वात महत्वाचं वर्षं ठरू शकते हे म्हणायला वाव आहे. पानिपत युद्धावर आधारित ‘पानिपत: द ग्रेट बिट्रेयल’ मधील सदाशिवराव भाऊ यांची मुख्य भूमिका अर्जुन कपूर साकारत असून तो त्यासाठी तयारी करत आहे. आशुतोष गोवारीकर हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून पुढील वर्षी ६ डिसेंबर २०१९ रोजी हा प्रदर्शित होणार आहे.
नुकतेच अक्षय तृतीया निमित्त या चित्रपटाचा सेट उभारण्यास सुरुवात करण्यात आली.
Construction BEGAN yesterday on the auspicious day of #AKSHAYTRITIYA!
Recreation of the ‘Shaniwar Wada’ to original scale! @nitindesai666 @agpplofficial @duttsanjay @arjunk26 @kritisanon @rohitshelatkar @visionworldfilm #sunitagowariker #Panipat pic.twitter.com/WoH7jjpadu— Ashutosh Gowariker (@AshGowariker) April 19, 2018
अर्जुनने आता चक्क मराठीचे धडे गिरवण्याचा निर्णय घेतला आहे. पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारित चित्रपटातील भूमिका प्रभावीपणे साकारण्यासाठी अर्जुनने हे पाऊल उचललं आहे. सदाशिवराव भाऊ ही भूमिका साकारण्यासाठी अर्जुनने अस्खलित मराठी शिकण्यावर भर देत आहे.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.