आर्यन खान ला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने क्रूझ शिप पार्टीवर टाकलेल्या २ ऑक्टोबर रोजीच्या छाप्यानंतर अटक होऊन जवळपास एक महिना तुरुंगात घालवावे लागले होते. काल दि. २८ ऑक्टोबर ला त्याला जामीन मंजूर झाला.
आर्यन खान च्या सुटकेचा जुही चावला चा वाटा?
अनेक चित्रपटांमध्ये शाहरुख खानची सहकलाकार असलेली अभिनेत्री जुही चावला हिने आज त्याचा मुलगा आर्यन खानची तुरुंगातून सुटका करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
जूही चावलाने मुंबई सत्र न्यायालयात आर्यन खानला जामीन देण्यासाठी आणि त्याच्या ₹ १ लाखांच्या जामीनावर स्वाक्षरी करण्यासाठी गेली. आर्यन खानने पैसे न दिल्यास ती कायदेशीररित्या जबाबदार असणार आहे.
२२ दिवस मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात काढलेल्या आर्यन खान च्या सुटकेसाठी ही कागदपत्रे तुरुंगाच्या पाठवणे महत्त्वाचे होते.
जुही चावला बद्दल
जुही चावला (वय ५३), शाहरुख खानच्या सुरुवातीच्या सहकलाकारांपैकी एक होती. या जोडीने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना दिले आहेत. हे दोघे नंतर आयपीएल संघ कोलकाता नाइट रायडर्सचे सह-मालक बनले. दोघेही चांगले मित्र आहेत.