म्हणून औरंगजेबाने महाराजा जयसिंग ह्यांना शिवाजी महाराजांचे पारीपत्य करण्यासाठी मोठे सैन्य देऊन पाठविले ?

0
म्हणून औरंगजेबाने महाराजा जयसिंग ह्यांना शिवाजी महाराजांचे पारीपत्य करण्यासाठी मोठे सैन्य देऊन पाठविले ?

LIVRO DOS REIS VIZINHOS

इ. स १६६५ च्या सुरवातीला औरंगजेब बादशहाने महाराजा जयसिंग ह्यांना शिवाजी महाराजांचे पारीपत्य करण्यासाठी मोठे सैन्य देऊन पाठविले आणि जयसिंग पुण्यात दिनांक ३ मार्च रोजी येऊन पोहोचले.
Credits
महाराजा जयसिंग ह्यांच्या शिवाजी महाराजांच्या मुलुखात स्वारीसंबंधी व्हॉईसरॉय आपल्या राज्यास लिहितो कि –

अली आदिलशहा राजाचा राज्याच्याची सीमा साळ नदीला भिडली असून ते शाष्टीमहालातील ते शापोरापर्यंतचे शेवटचे बंदर आहे आणि शापोरा हे देखील बारदेशचे शेवटचे बंदर आहे.
बारदेशामधे सांप्रत मोठी धामधूम सुरु आहे. कारण बऱ्याच वर्षा नंतर हिंदुस्थान मधला ( शिवाजी ) ह्या नावाचा देशी राजा आदिलशहा विरुद्ध बंड करीत उठला आहे. आदिलशहाच्या सैन्याशी शिवाजी आणि मराठ्यांच्या अनेक झटापटी ने लढाया झाल्या आहेत, पण त्या सर्व लढाया शिवजीनेच जिंकल्या आहेत. त्याचे कारण हे कि प्रदेश डोंगराळ असल्या कारणाने गनिमांच्या घोडदळाला त्या प्रदेशात हालचाली करता येत नाहीत. त्याचा फायदा शिवाजीला मिळाला आहे आणि म्हणून आदिलशहाच्या सैन्याचा त्या शिवाजीने पराभव केला आहे, आणि इतकेच नव्हे तर त्या आदिलशाही सैन्याची मोठी हानी केली आहे . हेच पाहून मोगल बादशहाने शिवाजी वर मोठे सैन्य धाडले पण त्या गनिमांच्या निष्काळजीपणाने म्हणा किंव्हा शिवाजी ने त्यांना पैश्याची लालच चारल्याने म्हणा , शिवाजी आपल्या मुलुखातून निसटला व बरोबर आठ किंव्हा दहा हजार सैन्य घेऊन तो दोन्ही सैन्यामधून तो एका विजेप्रमाणे बाहेर पडला. शिवाजी थेट सुरतेवर चालून गेला व त्याच्या हल्ल्याची कल्पना नसल्याने सुरत चे लोक गाफील होते.

त्यामुळे शिवाजीला मुळीच प्रतिकार झाला नाही. त्याने ते शहर खुशाल लुटले व लूट नौकांमध्ये भरून त्याने आपल्या मुलुखात पाठवून दिल्या. शिवाजी महाराजांनी सुरत लुटली हे औरंगजेबला कळताच त्याला भरपूर दुःख झाले आणि महाराजा जयसिंग ह्यांना शिवाजी महाराजांचे पारीपत्य करण्यासाठी मोठे सैन्य देऊन पाठविले.
Credit's
गोवा २८ जानेवारी, १६६६
Antonio De Melu De Kashnu

Reference- पोर्तुगीज दप्तर, आशिया विभाग

☀?⛳|| हर हर महादेव ||
|| जय भवानी, जय शिवाजी….||⛳?☀

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.