पुणेरी पगडी विरुद्ध मराठेशाही पगडी: पुण्यात होणारी मराठ्यांची टिंगल आणि टिंगल करणाऱ्यांना मराठ्यांचं खरमरीत प्रत्युत्तर…
छत्रपती शाहु महाराजांच्या काळात पुणेरी नेते वारंवार शाहु महाराजांवर टिकास्त्र चालवायचे. दस्तुरखुद्द छत्रपतींवर पुणेकर करत असलेल्या टिकेमुळे पुण्यातील व पुण्याबाहेरील मराठा समाजामध्ये पुण्यातील ठराविक ब्राह्मण लोकांविषयी राग उत्पन्न झाला. यातुन पुणे-कोल्हापुर वैमनस्य वाढत गेले.
त्याकाळी पुण्यामध्ये ब्राह्मण वर्गातील जहागिरदार व इनामदारांची वस्ती खुप मोठ्या प्रमाणात होती. या लोकांकडे किमान एकतरी घोडागाडी असायची. काही ठराविक ब्राह्मण लोक घोडागाडीवर असणाऱ्या कोचमन्सना भारदस्त मराठेशाही पगडी घालायला लावायचे. जेव्हा मालक गाडीत असेल तेव्हाच ही पगडी घालायची असाही नियम होता. कोचमन कोणत्याही जातीचा जरी असला तरी त्यास मराठेशाही पगडी च घालावी लागे. मराठ्यांची टिंगल करणे हा यामागील स्पष्ट व दुष्ट हेतु होता.
पुण्यातील मराठा विद्यार्थ्यांना ही गोष्ट खटकत असे. शिक्षणासाठी पुण्यात असणारे कोल्हापुरचे रावबहादूर पी.सी.पाटील यांनी ही खंत गप्पांच्या ओघात एकदा पुण्यातील मराठा उद्योजक बाबुराव जेधे यांना बोलुन दाखवली. जेधेंनी थोडा विचार केला व नोकरास बोलावुन त्यांनी नवीकोरी जरीची पुणेरी पगडी मागवुन घेतली. भडक लाल रंगाची ब्राह्मणी कोकीची ही पुणेरी पगडी त्यांनी आपल्या कोचमनला घालायला लावली. त्याला ब्राह्मणी पोषाख करायला लावला. ब्राह्मणी पोषाख व पुणेरी पगडी घालुन कोचमन तयार झाला. पाटील व जेधेसाहेब घोडागाडीत बसले. कोचमनने लगाम सोडला. घोडे उधळले. पुण्यातील प्रमुख मार्गांवरुन गाडी धावु लागली.
- सैराट चा हिंदी रिमेक “धडक” चा ट्रेलर रिलीज, काही वेळातच युट्यूब वर हिट
- पंतप्रधान शरद पवार? दिल्लीचेही तख्त राखतो, महाराष्ट्र माझा
ब्राह्मणी कोकीची पगडी घातलेला कोचमन पाहुन लोक खदखदुन हसत होते. गाडीत बसलेल्या पाटील व जेधेसाहेबांना आपल्या हेतु सफलतेचा आनंद होत होता. पुढे जेधेसाहेब दररोज अशा पद्धतीने बाहेर पडत. ब्राह्मणी पुणेरी पगडी घातलेला कोचमन पाहुन लोक “त्या” ठराविक ब्राह्मणांची टिंगल करु लागले. याचा योग्य तो परिणाम झाला व त्या ब्राह्मणांच्या घोडागाडीवरील कोचमनच्या डोक्यावरुन मराठेशाही पगडी गेली व तिथे साधे पागोटे आले.

पुण्यातील हे प्रकरण राजर्षी छत्रपती शाहु महाराजांच्या कानावर आले. छत्रपतींना गंमत वाटली व आनंदही झाला. पुढे छत्रपती पुण्यास आल्यावर पी.सी.पाटील महाराजांस भेटायला गेले असता महाराजांनी पगडी प्रकरणाची पाटलांकडे चौकशी केली व म्हणाले, ” पाटील,आपण बाबुरावांना भेटायला जाऊ.”
लागलीच पाटील व छत्रपतींची स्वारी “जेधे मेन्शन“कडे रवाना झाली. दारात गाडी उभी करुन महाराजांनी स्वतःच जेधेंना हाक मारली. बाबुराव जेधे धावतच बाहेर आले व छत्रपतींना मुजरा केला. छत्रपती त्यांच्या पाठीवर हात टाकुन म्हणाले, “शाब्बास पठ्ठे ! हाच खरा बाणेदार मराठा…!”
साभार – हा लेेख whataspp वर मिळाला असून क्रेडिट्स साठी @PuneriSpeaks शी संपर्क साधा
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
छत्रपती शिवाजी महाराज यांच आवडत गाणं | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks