बाळू लोखंडे यांची खुर्ची थेट इंग्लंड ला कधी पोहचली?

0
बाळू लोखंडे यांची खुर्ची थेट इंग्लंड ला कधी पोहचली?
Share

बाळू लोखंडे नावाची खुर्ची मँचेस्टर इंग्लंड मध्ये असल्याचा व्हिडिओ सध्या मराठी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्रिकेटप्रेमी क्रीडापत्रकार सुनंदन लेले भारत दौऱ्यासाठी इंग्लंडला गेले होते. मँचेस्टरमध्ये फिरत असताना त्यांना एक खुर्ची दिसल्याने धक्काच बसला. चक्क बाळू लोखंडे असे नाव लिहिलेली खुर्ची त्यांना मँचेस्टर मधील हॉटेल मध्ये आढळली.

अनेकांनी हा व्हिडिओ पाहत आपापली विनोदबुद्धी वापरत “ब्रिटिशांनी भारताची लूट केली त्याचा हा ऐतिहासिक पुरावाच आहे” असं म्हणत ही आश्चर्यकारक संदेश सुद्धा फॉरवर्ड केले. हजारो लोकांनी व्हिडिओ शेअर केल्याने तो अनेकांच्या मोबाइलवर पाहायला मिळू लागला आणि उत्कंठा वाढू लागली ती म्हणजे बाळू लोखंडे नक्की कोण याची?

बाळू लोखंडे व्हिडिओ Balu Lokhande Video

बाळू लोखंडे कोण आहेत?

सावळज(सांगली) मधील बाळू लोखंडे हे व्यावसायिक आहेत. माया मंडप डेकोरेटर्स नावाचा मंडप डेकोरेटर व्यवसाय ते करतात. जसेकी आपल्याला माहीत असेल की व्यावसायिक आपल्या वस्तूंवर स्वतःचे नाव टाकत असतात तसेच बाळू लोखंडे यांनी सुद्धा आपले नाव खुर्चीवर आणि बाकी मंडपाच्या वस्तूंवर टाकले होते.

बाळू लोखंडे यांची खुर्ची मँचेस्टर ला कशी पोहचली?

बाळू यांच्याकडे अशा १३ किलोच्या अनेक लोखंडी खुर्च्या होत्या. प्लॅस्टिक खुर्च्यांची वाढती मागणी आणि लोखंडी खुर्च्या जड असल्याने त्यांनी पंधरा वर्षापूर्वी खुर्च्या भंगार मध्ये विकून टाकून प्लॅस्टिकच्या खुर्च्या घेतल्या. या खुर्च्या भंगाराच्या दुकानातून मुंबईला गेल्या असता त्यांना अँटिक समजून विदेशी व्यक्तीने विकत घेतल्या असाव्यात. टिकाऊ आणि जुन्या खुर्च्या असल्याने त्यांचा वापर मँचेस्टर मधील हॉटेल करताना दिसत आहे.

©PuneriSpeaks

Like us on FB PageTwitter, and Instagram

MORE:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.