पिंपरी-चिंचवड मनपात दिवाळी भेटवस्तूंना बंदी : आयुक्त हर्डीकरांचे आदेश

0
पिंपरी-चिंचवड मनपात दिवाळी भेटवस्तूंना बंदी : आयुक्त हर्डीकरांचे आदेश

पिं. चिंचवड: दिवाळी म्हणले की महागड्या भेटवस्तु देणे-घेणे आलेच.त्यातच पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची चांदी होते.

दिवाळीच्या चार-पाच दिवस आधी ठेकेदार आणि मध्यस्थांकडून अधिकारी, पदाधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या महागड्या भेटवस्तूंच्या रेलचेलीने महापालिका भवन दरवर्षी अक्षरशः भरून गेलेले असते. परंतु या सर्व प्रकारावर चाप लावण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर सरसावले असून त्यांनी सुरक्षा रक्षकांना भेटवस्तु मनपात सोडण्यास मनाई केली आहे.

या सर्व प्रकारामुळे पालिकेतील अधिकारी आणि पदाधिकारी यांना मिळणाऱ्या मलाईवर सणासुदीचे विघ्न आल्यासारखे झालेय. महापालिकेत पंधरा-वीस वर्षांच्या काळात दिवाळी सणाच्या वेळी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना महागड्या भेटवस्तू देण्याचा पायंडाच पडला होता. दिवाळी आली की ठेकेदार सोन्या-चांदीची नाणी, ड्रायफ्रूट्ससह महागडे मोबाईल, उंची कपडे इत्यादी भेटवस्तू महापालिकेच्या भवनात येऊन अधिकारी-पदाधिकाऱ्यांना देत असे. अधिकाऱ्यांच्या शिपायांचे दिवस भेटवस्तु ऑफिस मधुन गाडीत घेऊन जाण्यातच जायचे.

पण आता या सर्वांवर चाप बसलेला दिसत असून अधिकारी-पदाधिकारी यांना ह्या भेटवस्तु पालिकेबाहेर स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. थोड्या प्रमाणात का होईना पण यामुळे भ्रष्टाचारावर तरी आळा बसेल.

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.