आपल्या मागण्यांसाठी मार्च मध्ये दुसऱ्या आठवड्यात बँका बंद राहणार आहेत, बँक कर्मचारी तीन दिवसांचा संप पुकारणार आहेत. ११ मार्च २०२० ते १३ मार्च २०२० दरम्यान कर्मचाऱ्यांनी संपावर जाणार आहेत.
१४ मार्च रोजी दुसरा शनिवार आणि १५ मार्च रोजी रविवार असल्यामुळे बँक बंद राहणार आहेत. तसेच दहा मार्च रोजी होळी असल्यामुळे बँकांना सुट्या असणार आहेत. त्यामुळे मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सलग सहा दिवस बँकांची दारे बंद राहणार आहेत. सर्वसामान्य नागरिकांना या दिवसांमध्ये मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. एटीएममध्ये पैशांचा तुडवडा पडू शकतो. त्यामुळे शक्यतो सर्वसामान्य नागरिकांनी मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात बँकेची सर्व कामे पूर्ण करावीत
आपल्या अनेक मागण्यांसाठी इंडियन बँक असोसिएशन कडून संप पुकारण्यात येणार आह. कामाचं समान वेतन, कामाची निर्धारित वेळ, पेन्शन, पाच दिवसांचा आठवडा अशा मागण्यांसाठी कर्मचारी संघटना संप पुकारणार आहेत.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
शिवाजी महाराज बलात्काराच्या गुन्ह्यासाठी कोणती शिक्षा द्यायचे? चौरंग शिक्षा म्हणजे काय?