बोरगावचा ढाण्या वाघ हारपला..
अन्यायाविरोधात पेटून उठून कायदा हातात घेतलेले आणि गुन्हेगारी क्षेत्राकडे वळलेले बापू बिरू वाटेगांवकर यांचं आज निधन झालं. वयोमानाने थकले होते. काही दिवस झाले त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला होता. बापू बिरू वाटेगांवकर म्हणलं की एके काळी आख्खा सातारा-सांगली भागातले टगे-गावगुंड हादरायचे. खाजगी सावकार, गाव-गुंड आणि गरीब लोकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी लढा दिला होता.
गावगुंडांचा कर्दनकाळ, सर्वसामान्य जनतेचा आधार :
प्रचंड दहशत, टवाळखोर गुंडांची टोळी याच्या बळावर बोरगावात गावगुंडानी घातलेले थैमान. गरिबांच्या लेकी-सुना त्यांच्या वासनेच्या बळी पडत होत्या. याचा जाब विचारणारा कोणी नव्हता. दाद मागायचे धाडस कोनात नव्हते. अश्या प्रतिकूल परिस्थितीत त्याच गावच्या तांबड्या मातीत कुस्ती खेळणारा एक पैलवान पुढे सरसावला. ते नाव म्हणजे बापू बिरू वाटेगावकर. सह्याद्रीच्या कडेकपारीत लपून त्यानी अन्यायाविरुध्द लढा सुरु ठेवला होता.
गावगुंडांची मुंडकी कुऱ्हाडीने उडवून हा बहादर फरार झाला. सह्याद्रीच्या कडेकपारीत लपून त्यानी अन्यायाविरुध्द लढा सुरु केला. पोलिसांनी सातारा सांगली जिल्हा पिंजून काढला पण हे वारे कोणाच्याच हाती लागले नाही. जवळजवळ ३० वर्षे पोलिसांना गुंगारा देत बापू बिरू वास्तदानी बोरगाव पंचक्रोशीतील गुंडगिरी, सावकारी कायमची बंद केली.
पोलिसांसमोर बिनशर्थ शरणागती पत्करली :
कायद्याने दिलेली शिक्षा भोगून बापू बिरू काही वर्षापूर्वी गावी परतले आहेत. आपले उर्वरित जीवन भजन कीर्तन आणि प्रवचनात व्यथित करत होते.
बापू बिरू वाटेगावकर यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो.
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
For More:
आपल्या समाजाला न कळलेले संभाजी महाराज…
स्वामी विवेकानंद ज्यांनी जगाला दिली बंधुभावाची शिकवण.
बापूना भावपूर्ण श्रद्धांजली