भारतातील सर्वोत्कृष्ट 5 इलेक्ट्रिक बाईक | मराठी

0
भारतातील सर्वोत्कृष्ट 5 इलेक्ट्रिक बाईक | मराठी
Share

सध्या इलेक्ट्रिक बाईक ची चांगलीच धामधूम आहे. आम्ही आपल्यासाठी सर्वोत्कृष्ट 5 इलेक्ट्रिक बाईक ची माहिती घेऊन आलो आहोत. आपण आपल्या दररोजच्या प्रवासासाठी इलेक्ट्रिक दुचाकी वाहनाचा विचार करीत असल्यास हा लेख आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. सध्या भारतात प्रसिद्ध इलेक्ट्रिक बाईक चा बोलबाला वाढत आहे.

चला तर जाणून घेऊयात सर्वोत्कृष्ट 5 इलेक्ट्रिक बाईक

Revolt RV300

Revolt RV300 ही इलेक्ट्रिक टू-व्हीलर तुम्हाला एका चार्ज मध्ये सर्वाधिक अंतर घेऊन जाऊ शकते. Revolt RV300 ई-बाईक एकदा चार्ज केल्यावर 180 किमी धावते. यामध्ये वेगवेगळे मोड देखील असून आपल्या आवडीनुसार आपण या गाडीची मजा घेऊ शकता.

मर्यादा80-180 किमी
सर्वाधिक वेग25-65 ताशी किमी
चार्जिंग वेळ4.2 तास
मोटर शक्ती (Rated)1500 वॅट
किंमत1,10,963

Odysse Hawk Plus

Odysse Hawk Plus मध्ये बर्‍याच लक्षणीय गोष्टी आहेत. या ई-स्कूटरमध्ये ब्ल्यूटूथ साऊंड सिस्टम, क्रूझ कंट्रोल आणि यूएसबी चार्जिंग सह सुुुसज्ज आले. विशेष म्हणजे कंपनीने एका चार्ज मध्ये 170 किमी चा दावा केला आहे.

मर्यादा170 किमी
चार्जिंग वेळ4 तास
मोटर शक्ती (Rated)1800 वॅट
किंमत98,500

Kabira KM 4000

गोवा आधारित स्टार्टअप कबीरा मोबिलिटीने KM 4000 इलेक्ट्रिक बाईक बाजारात आणली आहे. नुकत्याच लाँच झालेली Kabira KM 4000 ई-बाईक ही दिसण्यात सर्वाधिक आकर्षक असून महाग देखील आहे. कंपनीने एका चार्ज मध्ये 150 किमी चा दावा केला आहे. ही गाडी 120kmph च्या सर्वाधिक वेगाचा दावा करते.

मर्यादा150 किमी
सर्वाधिक वेग120 ताशी किमी
चार्जिंग वेळ6.5 तास
मोटर शक्ती (Rated)8000 वॅट
किंमत1,36,000

Revolt RV400

Revolt RV400 अनेक बाजूने RV 300 सारखी आहे. यात जास्त शक्तिशाली मोटर वापरण्यात आली असून त्याची वेगमर्यादा 150 ताशी किमी पर्यंत आहे. कंपनीने एका चार्ज मध्ये गाडी 150 किमी पर्यंत धावू शकते. RV 400 ची किंमत 1.29 लाख रुपये आहे.

मर्यादा150 किमी
सर्वाधिक वेग150 ताशी किमी
चार्जिंग वेळ4.5 तास
मोटर शक्ती (Rated)3000 वॅट
किंमत1,29,000

Bajaj Chetak

बजाज आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटर च्या आगमनानंतर आपले अढळ स्थान पुन्हा एकदा टिकवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहेः Urbane आणि Premium. या स्कूटरची किंमती 1 लाख रुपयांपासून सुरू होते.

मर्यादा95 किमी
सर्वाधिक वेग60 ताशी किमी
चार्जिंग वेळ5 तास
मोटर शक्ती (Rated)4800 वॅट
किंमत1,15,000

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.