उदयनराजे भोसले यांनी समाजामध्ये तेढ निर्माण करणा-यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.
त्याचप्रमाणे उदयनराजेंनी कोणीही सामाजिक तेढ किंवा उद्रेक होईल अशी वक्तव्य करू नका, असे आवाहन सुद्धा त्यांनी केले आहे.
भिडे गुरुजी यांच्या विरोधामध्ये बोलणाऱ्यांची लायकी नाही : उदयनराजे
वडीलधाऱ्या असणाऱ्या गुरुजींचे आणि माझे कोरेगाव भीमा प्रकरणानंतर बोलणे झाले, त्यावेळी बोलत असताना गुरुजी रडले, असे उदयनराजे यांनी सांगितले. मला त्यांच्याबद्दल आदर आहे आणि तो आदर राहाणार. असेही ते म्हणाले.
भिडे गुरुजींचं स्पष्टीकरण :
Sambhaji Bhide, prime accused in #BhimaKoregaon incident, issues a press note, says “Prakash Ambedkar blamed me for the conspiracy which is completely wrong, demand the Government to investigate this matter thoroughly, strong punishment must be given to whoever is guilty”
— ANI (@ANI) January 5, 2018
प्रकाश आंबेडकर यांनी माझ्यावर निराधार आरोप केले असून शासनाने या घटनेची खोलात चौकशी करावी व दोषींना कठोर शिक्षा द्यावी.
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी गुरुवारी ४ जानेवारीला पत्रकाद्वारे कोरेगाव-भीमा येथे घडलेल्या हिंसाचाराच्या आरोपींना कठोर शिक्षा द्यावी अशी केली आहे.
भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमध्ये मी उपस्थित होतो व कारणीभूत आहेत, असे विधान केलं आहे. त्यांचे हे आरोप निराधार असून शासनाने या घटनेची चौकशी व दोषी आहेत त्यांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
भीमा कोरेगाव येथे झालेला प्रकार अशोभनीय : शरद पवार
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.