Bitcoin in Marathi । Bitcoin म्हणजे काय? जाणून घ्या मराठीत

0
Bitcoin in Marathi । Bitcoin म्हणजे काय? जाणून घ्या मराठीत

Bitcoin in Marathi

Bitcoin म्हणजे काय रे असा प्रश्न तुम्हाला सध्या तरी भरपूर जण विचारत असतील, तर त्यासाठी आम्ही Bitcoins ची माहिती घेऊन आलोय अस्सल मराठीत आणि तेही तुम्हाला कळेल अशा भाषेत Bitcoin in Marathi.

Bitcoins म्हणजे काय? (what exactly is bitcoin) | Bitcoin in Marathi

Bitcoin एक आभासी चलन आहे. डॉलर, रुपया अशा इतर चलनांप्रमाणे Bitcoin एक डिजिटल चलन आहे. हे इतर चलनांपेक्षा खूपच वेगळे आहे कारण आपण Bitcoin ला पाहू शकत नाही किंवा आपण त्याला पैशाप्रकारे हाताळू शकत नाही. आपण Bitcoin फक्त ऑनलाइन वॉलेटमध्ये संग्रह करू शकतो. बीटकॉईनचा (Bitcoin) शोध 2009 साली सतोशी नाकामोतो (Satoshi Nakomoto) यांनी लावला आणि तेव्हापासून त्याची लोकप्रियता वाढत आहे. विकिपीडिया एक विकेंद्रीकृत चलन आहे, जे ते नियंत्रित करण्यासाठी बँक किंवा सरकार यांना अधिकार नाहीत, याचा अर्थ असा की, म्हणजेच Bitcoin कोणाच्याही मालकीचे नाही. कोणीही Bitcoin चा वापर करू शकतो, जसे की आपण इंटरनेट चा वापर करतो.

Bitcoin चा वापर कुठे केला जातो? (What can you buy with bitcoins) | Bitcoin in Marathi

Bitcoin ऑनलाइन पैसे भरणा किंवा कोणत्याही प्रकारच्या व्यवहारासाठी वापरले जाऊ शकते. बीटकोइन नेटवर्कचे पीअर करण्यासाठी कार्य करते ज्याचा अर्थ असा आहे की लोक सहजपणे कोणत्याही बँकेशिवाय, क्रेडिट कार्ड किंवा कोणत्याही कंपनीशिवाय सहजपणे व्यवहार करू शकतात. Bitcoin चा उपयोग व्यवहारामध्ये जलद आणि कार्यक्षम मानला जातो. बरेच Developers, उद्योजक, विना नफा संस्था इत्यादी आज ऑनलाइन Bitcoin वापरत आहेत. आणि यामुळे, जगभरात देवाणघेवाण करण्यासाठी बिटकॉइनचा वापर केला जात आहे.
जसे उर्वरित चलनाचा उपयोग करून आपण ऑनलाइन व्यवहार करतो, ज्यासाठी आपल्याला बँक ची प्रक्रिया पार करत व्यवहार करावे लागतात आणि त्याची नोंद बँकेकडे असते. ज्यावरून आपल्याला आणि बँकेला सुद्धा समजते कि किती पैसे काढले किंवा भरले. परंतु Bitcoin वर केलेले व्यवहार हे कोणाच्या मालकीचे नसून त्याची नोंद सार्वजनिक खात्यात होते ज्याला “Bitcoin blockchain” म्हणतात आणि त्यात आपण केलेल्या व्यवहाराचे रेकॉर्ड राहतात. Bitcoin ने केलेले सर्व व्यवहार तिथे साठविले जातात आणि Blockchain हा व्यवहार झाले किंवा नाही याचा पुरावा म्हणून वापरतात.

Bitcoin चे मूल्य किती आहे? (Bitcoin price) | Bitcoin in Marathi

भारतीय चलनानुसार सध्या १ Bitcoin चे मूल्य सुमारे ९१७०३५ रुपये आहे. त्याचे मूल्य कमी अधिक होत असते कारण त्यावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार कोणाकडे नाही, त्यामुळे त्याची किंमत त्याच्या मागणीनुसार बदलते.

Bitcoin Wallet काय आहे? (what is bitcoin wallet) | Bitcoin in Marathi

बिटकॉइन आपण फक्त इलेक्ट्रॉनिक रुपात संचयित करू शकतो आणि ती ठेवण्यासाठी बिटकॉइन वॉलेटची आवश्यकता असते. बिटकॉइन वॉलेटचे अनेक प्रकार आहेत ज्यात Desktop Pocket, Mobile Pocket, Online/Web Base Pocket, Hardware Pocket यापैकी कोणत्याही एका Pocket चा आपण वापर करून त्यात आपले खाते तयार करू शकता, यात खाते आपल्याला एका विशिष्ट प्रकारचा कोड देतो ज्यावर आपण कमावलेले किंवा खरेदी केलेले Bitcoin त्या कोड वरून पाकिटात ठेऊ शकतो. आपण कमावलेले किंवा खरेदी केलेले Bitcoins आपण वॉलेट मधून आपल्या बँक खात्यात हस्तांतरण करू शकता.

Bitcoins कसे कमावता येतील? (how to buy bitcoin) | Bitcoin in Marathi

आपण तीन मार्गांनी Bitcoins कमवू शकतो-
1. पहिली म्हणजे जर आपल्याकडे पैसे असतील तर आपण थेट पैसे देऊन Bitcoins खरेदी करू शकता. असे नाही की जर आपल्याला Bitcoin खरेदी करायचा असेल तर १ संपूर्ण Bitcoin घ्यावा लागेल, आपण Bitcoins मधील सर्वात लहान एकक “सतोशी” देखील विकत घेऊ शकता. जसे भारतात १ रुपयामध्ये १०० पैसे असतात तसेच Bitcoin मध्ये १ करोड सतोशी (Satoshi) असतात. आपल्याला वाटले तर आपण आपण १ सतोशी घेऊन सुद्धा सुरुवात करू शकतो, ते साठवत जाऊन १ Bitcoin जमवू शकतो. जेव्हा आपण घेतलेल्या किमतीपेक्षा Bitcoin ची किंमत जास्त होईल तेव्हा आपण त्याची विक्री करून अधिक पैसे कमवू शकतो.

2. दुसरी एक पद्धत म्हणजे आपण Online काहीही विकून त्याच्याकडून पैसे Bitcoins च्या स्वरुपात घेऊ शकतो. याप्रकारे आपण आपले सामान-सामग्री विकून Bitcoin मिळवू शकतो आणि वॉलेट मध्ये साठवून किंमत वाढल्यावर विकू शकतो.

3. तिसरी पद्धत म्हणजे “Bitcoin Mining” करणे. यासाठी, आपल्याला एका हाय स्पीड प्रोसेसरसह संगणकाची गरज आहे, ज्याचा हार्डवेअर देखील उत्तम असावा. Bitcoins केवळ ऑनलाईन पेमेंटसाठी वापरतात आणि जेव्हा कोणी बिटकॉइन देते, तेव्हा व्यवहार खराखोटा आहे त्याची पडताळणी केली जाते, या व्यवहाराची पडताळणी करतात त्यांना Bitcoin Miners म्हणतात आणि त्यांच्याकडे उच्च कार्यक्षमता असलेले संगणक आणि जीपीयू असतात आणि ते त्याद्वारे व्यवहारांची पडताळणी करतात. ते सत्यापित करतात की व्यवहार खरे आहेत किंवा त्यामध्ये कोणत्याही प्रकारे घोळ केले गेले आहेत. या पडताळणीचे त्यांना काही Bitcoins बक्षीस म्हणून मिळतात आणि अशाप्रकारे नवीन Bitcoins बाजारात येतात. कोणीही असे करून Bitcoins कमवू शकते, त्यासाठी संगणकास एका हाय स्पीड प्रोसेसरची गरज असते जे प्रत्येकाच्या आवाक्यात नसते.

जसे प्रत्येक देशात चलन छपाईसाठी काही मर्यादा असतात त्यानुसार एका वर्षात ठराविक मर्यादेत राहून चलन छपाई केली जाते. तसेच Bitcoins ला सुद्धा काही मर्यादा आहेत, त्यानुसार बाजारात 21 दशलक्ष पेक्षा जास्त Bitcoins येऊ शकत नाहीत. म्हणजेच Bitcoins ची मर्यादा ही २१ दशलक्ष आहे. सध्या बाजारात फक्त १३ दशलक्ष Bitcoins आल्या असून राहिलेल्या Bitcoins Mining द्वारे तयार होतील.

Bitcoin वापरण्याचे फायदे काय आहेत? (advantages of bitcoin) | Bitcoin in Marathi

१. आपण क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डने केलेल्या व्यवहारावर आपल्याला ठराविक शुल्क लावला जातो त्यापेक्षा Bitcoins ने केलेल्या व्यवहारावर शुल्क आकारणी खुप कमी आहे.
२. Bitcoins आपण जगात कुठेही आणि कोणत्याही त्रासाशिवाय पाठवू शकता.
३. Bitcoins चे खाते कधीही ब्लॉक होत नाही जसेकी काही कारणास्तव बँक आपले क्रेडिट किंवा डेबिट कार्ड ब्लॉक करते तसा त्रास यात होत नाही..
४. आपणाला जर दीर्घ कालावधीसाठी Bitcoins मध्ये गुंतवणूक करायची असेल तर यातून आपल्याला भरपूर फायदा होऊ शकतो. दिवसेंदिवस Bitcoin ची किंमत वाढत चालली आहे. त्यानुसार भविष्यकाळात आपल्याला फायदा होण्याची संधी आहे. परंतु ही गुंतवणूक आपण आपल्या जोखीम वर करावी कारण Bitcoins कधीही स्थिर राहत नाहीत.

५. Bitcoins च्या व्यवहारात सरकारचा कोणताही हस्तक्षेप नसून आपल्या व्यवहारावर सरकारची कोणत्याही प्रकारे नजर नसते त्यामुळे Underworld मध्ये Bitcoins ची जोरदार मागणी आहे.

Bitcoins वापरण्याचे काय तोटे आहेत? (disadvantages of bitcoin) | Bitcoin in Marathi

१. Bitcoins वर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही अधिकार संस्था, बँक किंवा सरकार नाही, ज्यामुळे बिटकॉइनच्या किंमतीत मोठी चढ-उतार दिसून येते, त्यामुळे हे थोडे धोकादायक बनते.
२. जर आपले खाते कधीही हॅक झाले तर आपण आपल्या सर्व bitcoins गमवून बसू शकतो आणि त्या परत आणले जाऊ शकणार नाही, यामध्ये आपली कोणीही मदत करु शकत नाही.

Bitcoins कसे विकत घ्यावे (How to Buy Bitcoin in India) | Bitcoin in Marathi

जसे आपण सोने खरेदी करता तसेच भारतीय चलनात सुद्धा Bitcoins खरेदी करू शकता. तर चला बघूया की अशा कोणत्या वेबसाइट्स आहेत जिथे आपण Bitcoins विकत घेऊ शकता, अगदी आपल्या स्वतःच्या चलनात.
या वेबसाइटमध्ये, आपण Bitcoin ची सध्याची किंमत जाणून घेऊन विकत घेऊ शकता.
१. Unocoin
२. Zebpay

ही होती Bitcoin ची माहिती, मला आशा आहे की तुम्हाला Bitcoin काय आहे हे समजले असेल, ते कसे घेऊ शकता, आणि त्याचे फायदे आणि नुकसान काय आहे.
हा लेख Bitcoin ची माहिती मिळावी यासाठी दिला असून Bitcoin आपल्या जोखीमवर विकत घ्यावे.

More News:

Top 10 Most Powerful Militaries in the World

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
©PuneriSpeaks

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.