शेतकरी चोर आणि बेईमान आहेत, त्यांना चपलेने मारलं पाहिजे; भाजप नेते हकम सिंह अनजाना यांचे वादग्रस्त विधान

0
शेतकरी चोर आणि बेईमान आहेत, त्यांना चपलेने मारलं पाहिजे; भाजप नेते हकम सिंह अनजाना यांचे वादग्रस्त विधान

भाजपचे नेते वादग्रस्त वक्तव्य यांचे नाते संपताना काही दिसत नाही. त्यातील काही नेते जनसामान्यांना चिडवण्याचे काम करत आहेत. शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणून ओळखले जाते. त्याच शेतकऱ्यांविषयी भाजप नेत्याने अपशब्द वापरले आहेत.  मध्य प्रदेशमधील भाजपच्या नेत्याने शेतकऱ्यांविषयी अतिशय असंवेदनशील असे वक्तव्य केले आहे. भाजप नेते हकम सिंह अनजानांच्या मते शेतकरी अप्रामाणिक असतात आणि त्यांना चपलेने मारायला हवे. हकम सिंह अनजानांचा शेतकऱ्यांचा अपमान करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शेतकरी भ्रष्टाचारी असल्याचा त्यांनी आरोप केला आहे.

‘मध्य प्रदेश सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत असूनही शेतकरी सरकारवर नाराज आहेत कारण सध्याच्या काळात शेतकरी सगळ्यात बेईमान जात आहे, असे वादग्रस्त विधान हकम सिंह अनजाना यांनी करून नवीन वादाला तोंड फोडले आहे . सध्या शेतकऱ्यांएवढं बेईमान कोणीच नाही. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकऱ्यांसाठी जेवढं केलं तेवढं आजवर झालेल्या इतर मुख्यमंत्री आणि सरकारने केलेलं नाही, तसेच कोण करणारही नाही.’ असे ते म्हणाले.

अनजाना पुढे म्हणाले की, शेतकरी कधी सुधारणार नाहीत. त्यांना चपला मारल्या पाहिजेत. मी देखील एक शेतकरी आहे आणि शिवराज सिंह चौहान यांच्या कामाविषयी समाधानी असल्याचे ते म्हणाले.

मध्यप्रदेशात अनेक दिवसांपासून शेतमालाला हमीभाव आणि कर्जमाफीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत. शेतकरी १ जूनपासून १० जूनपर्यंत मोठे आंदोलन उभारणार आहेत त्या पार्श्वभूमीवर अनजाना यांनी हे वक्तव्य केलं.

हकम सिंह अनजाना यांचा वादग्रस्त व्हीडीओ

हकम सिंह अनजाना यांना पक्षातून हाकलले

भाजपाने हकम सिंह अनजाना यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांना पक्षातून बडतर्फ केले आहे.  ते भाजपच्या उज्जैन ग्रामीण भागाचे जनरल सेक्रेटरी होते. विशेष म्हणजे ते भाजप किसान मोर्चा चे सदस्य सुद्धा होते.

आल्याला या वक्तव्यावर काय वाटते ? आम्हाला नक्की कळवा.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

IPL विजेता टीम ला मिळणार एवढे पैसे, हरणारी टीम सुद्धा होणार करोडपती

इंधन दरवाढीला विरोध करण्यासाठी ब्राझीलच्या ट्रकवाल्यांनी लढवली नामी शक्कल, सरकारची आणीबाणीची घोषणा

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.