आजकाल इंटरनेटच्या जमान्यात जे टाकेल ते खपते याची प्रचीती आपल्याला रोजच्या घडामोडींवरून दिसून येते. जर कोणी बोलले की इकडे इकडे उल्कापात झालाय तर लोक शहानिशा करायच्या आधीच विश्वास ठेऊन पुढे ढकलून देतात. २० जणांना शेअर करा धनलाभ होईल…..नाही केले तर कोप होईल…. असल्या पोस्ट तर दिवसेंदिवस जास्तच पसरत जातात. याचाच फायदा घेत सोशल मीडियावर एक नवा काळ आला ज्याने संपूर्ण जगच सामावून घेतले तो काळ म्हणजे……..’सोशल मीडियावर चाललेला अपप्रचार’, ओरडून ओरडून फेक बातम्या पसरवणे आणि त्यातच नवीन म्हणजे एकमेकांविरोधात मिम बनवून ते सर्वत्र पसरवून त्या त्या पक्षाचा असा अपप्रचार करायचा कि लोकं म्हणाली पाहिजेत की एवढे म्हणतायेत तर असेलच की……..
भारतात याच प्रकारच्या विळख्यात पहिल्यांदा अडकली ती म्हणजे ‘कॉंग्रेस’, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वर्षभराच्या आधी काहींनी सोशल मीडियामध्ये कॉंग्रेस चा एवढा अपप्रचार केला की आज कॉंग्रेस डबघाईला आलेली दिसते. आपल्याला सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मनमोहन सिंग यांचे चेहरे लावलेले अनेक मिम आत्ता आठवत असतील. त्यावेळी भाजपने केलेल्या अपप्रचारामुळे आजही कॉंग्रेसचा पाय वर निघत नाहीये. यांना निवडून आल्यानंतर जेल मध्ये टाकू म्हणणारे जवळपास ४ वर्ष पूर्ण होऊनही कोणाच्याही विरोधात एकही पुरावा सादर करू शकले नाहीत.
याचाच प्रत्यय २०१४ च्या महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकीत आला. देवेंद्र फडणवीस यांनी तर बैलगाडी भरून सिंचन घोटाळ्याचे पुरावे विधानसभेवर घेऊन आले होते, परंतु ते पुरावे ४ वर्ष उलटूनही कोणाला दिसले नाहीत हेच विशेष…….! सिंचन घोटाळा, लवासा, आदर्श घोटाळा म्हणत म्हणत देवेद्र फडणवीस सत्तेवर आले. तेही सोशल मीडियाच्या जोरावर……. तेव्हाचे शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार याच्यावरील पोस्ट लोकांनी शहानिशा न करता पटापट पुढे पाठवल्या……. पण त्याची चौकशी अजूनही ४-५ वर्ष झाली तरी रेंगाळत आहे. कोणती निवडणूक आली की अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात अटक होणार हि बातमी तर नित्याचीच झालीय…… चक्क अजित पवार सुद्धा याला कंटाळले असतील असे मानायला नवल नको. पण लोकं अजूनही त्याच त्याच भूलथापांना बळी पडत असून विकास बाजूला ठेऊन भरकटत चालले आहेत. एकाने मराठीचा मुद्दा उचलायचा, एकाने राम मंदिरचा मुद्दा उचलायचा, राहिला काश्मीर मुद्दा, जर यातून शिल्लक राहिलेच तर पाकिस्तान मध्येच घुसवून सर्व भारतीयांचा देशाभिमान जागवण्याचा प्रयत्न करत निवडणूक जिंकायचा राजकारण्याचा रोजचाच डाव चालला आहे…… ह्याला भुलतो ते आपण…
२०१४ ला जे झाले याचाच प्रत्यय पुन्हा एकदा २०१९ च्या निवडणुकीत दिसेल यात शंका नाही ….. सध्या भाजपच्या मिडिया सेलने याची जोरदार सुरुवात करत सोशल मिडीयावर शरद पवार यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे.
फेसबुक वर याची मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली दिसत असून #हल्लाबोल आंदोलनाच्या यशानंतर हा विरोध दिसायला लागला आहे.
चला तर पाहुयात त्यांनी तयार केलेल्या पोस्ट्स….
१.
२.
३.
४.
५.
६.
७.
८.
२०१९ ची पूर्वतयारी लक्षात घेता उचललेली ही पावले नक्की कोणाला बुडवतात हेच पहावे लागेल. ‘खोटं बोल पण रेटून बोल’ या वृत्तीचा येथे अनुभव येतो.
काही विरोधात तर काही त्यांच्या बाजूने विरोध दर्शवत आहेत…. त्यातील काही ठराविक कंमेंटस
१.
२.
३.
४.
५.
६.
या अशा लढाईत तुम्ही कोणत्या मतप्रवाहात मोडता आम्हाला नक्की कळवा…
@PuneriSpeaks