Share
गुजरात: खुप दिवसांपासून चर्चेत असलेल्या गुजरात निवडणुकीचा निकाल अखेर लागला असुन भाजपने मुसंडी मारत गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन्हीही ठिकाणी बहुमताने सत्ता खेचुन आणली आहे.
मतमोजणीवेळी पहिल्या अर्ध्या तासात आघाडीवर असलेला भाजप गुजरातमध्ये धक्कादायकरित्या पिछाडीवर गेला असता काँग्रेसकडून आनंद साजरा करायला सुरुवात झाली होती परंतु काही वेळातच भाजप पुन्हा आघाडीवर येत आघाडी कायम ठेवली. हिमाचलमध्ये भाजपकडे सुरूवातीपासून आघाडी राहत सत्ता काबीज केली आहे. हिमाचलचा इतिहास पाहता तिथे प्रत्येक पाच वर्षांनी सत्तांतर हे होतेच त्यानुसार जनतेने आधीच्या सत्ताधीश काँग्रेसला बाजूला सारत भाजपला बहुमत देऊन सत्तेवरआणले आहे.
सध्याचा निकाल:
गुजरात
BJP: 101
Congress: 76
Others: 5
हिमाचल प्रदेश
BJP: 43
Congress: 21
Others: 4
ह्या आकडेवारीनुसार भाजप दोन्ही ठिकाणी बहुमताने निवडून येतेय हे पक्के झाले असून संपूर्ण भारतात भाजप कार्यालयात जल्लोष केला जातोय….