अरे वाह! अडीच लाखात BMW ची नवी बाईक लाँच

0
अरे वाह! अडीच लाखात BMW ची नवी बाईक लाँच
Share

BMW ने भारतात सर्वात स्वस्त बाईक BMW G310R लाँच केली आहे. G310R ची किंमत 2.45 लाख रुपये जाहीर केली आहे. BS-6 सह लाँच झालेली बीएमडब्लू ची ही गाडी आत्तापर्यंत सर्वात स्वस्त गाडी आहे.

BMW G310R ची वैशिष्ट्ये

  • BMW G310R ची किंमत BS-4 मॉडेल पेक्षा जवळपास 55,000 रुपये कमी आहे.
  • 313 CC, सिंगल-सिलेंडर लिक्विड-कूल्ड इंजिन.
  • पॉवर 34hp आणि टॉर्क 28Nm आहे, यामुळे गाडी हवेशी स्पर्धा करेल यात शंका नाही.
  • संपूर्ण LED लाइटिंग आणि नवीन रंगात उपलब्ध

2020 ची G310R तीन रंगामध्ये उपलब्ध आहे – निळा आणि पांढरा, काळा आणि पांढरा आणि एक चमकदार तीन-रंगात काळा, पांढरा आणि लाल. ‘स्टाईल स्पोर्ट’ नावाच्या मॉडेल मध्ये तीन-रंगाच्या पर्यायातही लाल रंगाची फ्रेम आणि चाके उपलब्ध होतील.

BMW G310R वर 3 वर्षाची अमर्यादित किलोमीटर वॉरंटी उपलब्ध आहे. 16250 रुपये देऊन ग्राहक दोन वर्षाचा कालावधी वाढवू शकतात. प्रथम 500 ग्राहकांना ही वाढीव वॉरंटी 5499 रुपयांच्या विशेष किंमतीवर उपलब्ध असेल.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.