पुणे कालवा दुर्घटना : धाडसी महिला कॉन्स्टेबल कोण?

0
पुणे कालवा दुर्घटना : धाडसी महिला कॉन्स्टेबल कोण?

Brave Pune Women Police Constable

पुण्यात गुरुवारी मुठा उजवा कालवा फुटल्याने दांडेकर पूल परिसरात पूरस्थिती निर्माण झाली होती.

यावेळी महिला पोलीस कॉन्स्टेबल निलिमा गायकवाड यांनी दाखवलेल्या धैर्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्यांनी नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवण्यासाठी केलेले प्रयत्नांबद्दल लोक त्यांना धन्यवाद देत आहेत. निलिमा गायकवाड यांनी स्वतः पाण्यात उतरुन एका लहान मुलाला आपल्या पाठीवर घेऊन धाडसाने त्याला पुरसदृश्य स्थितीतून बाहेर काढले. त्यांचा मदत करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सर्वजण या धाडसाला सलाम करत आहेत.

Pune CP tweeting about Brave Pune Women Police Constable work

निलिमा गायकवाड या दत्तवाडी पोलीस चौकीत महिला कॉन्स्टेबल आहेत. निलिमा यांना घटनेची माहिती मिळताच त्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी पाण्यात अडकलेल्या महिला आणि लहान मुलांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्याचे काम सुरू केले. त्यांनी अनेक मुलांना आणि महिलांना सुरक्षित स्थळी हलवले. त्यांच्या या मदतीने भागातील लोकांनी त्यांचे आभार मानले. त्यांच्या या कार्याबद्दल सोशल मीडियावर लोकांनी “पोलीस असावा तर असा” अशी उपमा देत आभार मानले.

Social Media thanking to Brave Pune Women Police Constable Nilima Gaikwad

निलिमा गायकवाड यांनी याआधी सुद्धा अनेक धाडसी कामे केली आहेत. त्यांना त्यांचे सहकारी धाडसी पोलीस म्हणतात.
अशा या पोलीस कॉन्स्टेबल ला @PuneriSpeaks चा मानाचा सलाम?
अशा पोलिसांची समाजाला खरी गरज असून त्यांचा सत्कार करायला हवा अशा प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त केल्या आहेत.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

तनुश्री दत्ता चा नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप

Sacred Games Season 2 is Coming Back, Confirms Netflix

25 Parenting Tips: मुलांसोबत कसे वागावे

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.