जाणून घ्या ब्रूस ली चा मृत्यु कसा झाला…

0
जाणून घ्या ब्रूस ली चा मृत्यु कसा झाला…

जाणून घ्या ब्रूस ली चा मृत्यु कसा झाला…

लहानपणी आपण सर्वांनी ब्रूस ली चे किस्से कायम ऐकायचो. त्याला आपण कुंगफू, मार्शल आर्ट्स आणि ड्रॅगन या शब्दांनीच ओळखायचो.
Photo Credit's
अजूनही आपल्यातील बहुतेक जणांना तायक्वांदो, कराटे किंवा कुंग फू यांतला फरक माहीत नसून बहुतेक जण ब्रुस लीला मार्शल आर्टस् करताना पाहूनच मोठे झाले आहेत.
बहुदा सर्वांनी ब्रूस लीची सर्वात गाजलेली चक नॉरिस बरोबरची लढाई पाहिलीच असेल…..पुन्हा एकदा ती तुम्ही Youtube वर पाहू शकता

लढाई दरम्यान त्यांची चपळाई आणि त्याच्या अविश्वसनीय वेग अद्वितीय मानला गेला आहे. ब्रुस ली एक कुशल कारागीर होता, त्यांने मार्शल आर्ट्सच्या मूलभूत संरचनेमध्ये काही बदल केले आहेत जे आजपर्यंत अनुसरण्यात येत आहेत.
Photo Credit's

बर्याच लोकांना माहिती नाही की ब्रुस लीचे वास्तविक नाव ली जॅन-फॅन होते. मार्शल आर्ट्सच्या तज्ज्ञांव्यतिरिक्त, ली एक प्रतिभाशाली कवीही होता.

लीचा प्रसिद्ध “एक इंच चा ठोसा’ सर्वात प्रसिद्ध होता. 1968 मध्ये त्यांने कॅलिफोर्नियातील लॉंग बीच मधील आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत हे प्रदर्शन केले होते. यानंतर त्याची प्रसिद्धी वाढतच गेली.

सर्वकाही परिपूर्ण होत असताना, अनपेक्षित असे घडले. त्या वेळी जगातील सर्वात महान मार्शल आर्टिस्ट 32 वर्षाच्या लहान वयातच गूढ परिस्थितीत मरण पावला.
photo Credit's
त्यानंतर अफवांतून असे म्हटले गेले की चिनी गुप्त विभागाकडून त्याची हत्या केली गेली. काहींनी तर त्याच्या प्रेयसीने त्याला रोज थोडे थोडे विष दिले असे सुद्धा म्हणले. तथापि, त्याच्या मृत्यूचे वास्तविक कारण ‘सेरेब्रल एडेमा’ होते.
Photo Credit's
ली सेरेब्रल एडेमा या रोगामुळे त्रस्त होता, यात मेंदूला सूज येऊन श्वसनास त्रास होतो आणि असामान्य वर्तन घडून येते. त्यामुळे तो अनेकवेळा चित्रपट सेट वर बेशुद्ध पडला होता.
त्याच्या मृत्यूआधी, ब्रुसे लीने हाँगकाँगमध्ये निर्माता रेमंड चोला भेट दिली होती, ‘गेम ऑफ डेथ’ चित्रपटासाठी संध्याकाळी चार वाजता बैठक झाली आणि त्यांना उघडकीस आले की त्याला गंभीर दुखापत झाली आहे. ली चे मित्र आणि सहकारी अभिनेत्री, बेट्टी टिंग पई यांनी त्याला एक वेदनशामक औषध दिले ज्याची दोन औषधे – अॅस्पिरिन आणि मेपरबोमाकेट यांचे मिश्रण होते.

त्याच संध्याकाळी, लीला सिनेमा तयार करण्याच्या उद्देशाने अभिनेता जॉर्ज लाझेनबाई (जेम्स बॉन्ड फेम) बरोबर जेवण करायचे होते. डिनरसाठी आला नाही म्हणून बोलावले आता तो बेशुद्ध आढळला, डॉक्टरांना बोलावल्यावर त्यांनी त्याला क्वीन एलिझाबेथ रुग्णालयात नेले आणि तिथे त्याला मृत घोषित केले. पोस्टमार्टमेच्या अहवालात म्हटले आहे की एस्प्रिन आणि मेप्रोबामात यांना एलर्जीची प्रतिक्रिया होती आणि त्यांचा मेंदूचा आकार 13% ने वाढला होता.

ली चे शरीर सिएटलला परत आले, जिथे अखेरीस त्याचे दफन करण्यात आले.
जगाने एक मोठा लढवैय्या गमावला…

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

संभाजी महाराज माहिती, छत्रपती संभाजी महाराज इतिहास, पराक्रम, राज्याभिषेक, मराठा साम्राज्य, संभाजी राजे महाराज विशेष

शिवाजी महाराज इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज माहिती, अफजलखान वध, शिवराज्याभिषेक, मराठा साम्राज्य, आग्र्याहून सुटका, शिवाजी महाराज वंशावळ

Top 10 Most Powerful Militaries in the World

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.