केंब्रिज अॅनालिटिका प्रकरण: फेसबुक माहिती चोरी प्रकरणी फेसबुक ला मोठे नुकसान, काय आहे प्रकरण? सविस्तर

0
केंब्रिज अॅनालिटिका प्रकरण: फेसबुक माहिती चोरी प्रकरणी फेसबुक ला मोठे नुकसान, काय आहे प्रकरण? सविस्तर

फेसबुक माहिती चोरी प्रकरण, केंब्रिज अॅनालिटिका प्रकरण

डोनाल्ड ट्रम्पच्या निवडणूक मोहिमेत काम करणारी डेटा एनालिटिक्स कंपनीने अमेरिकेतील व्होटरच्या लाखो फेसबुक प्रोफाईल्सची माहिती घेऊन मतदारांना प्रभावित केल्याचा खुलासा झाला आहे. एका व्यक्तीने याचा खुलासा केला आहे की रॉबर्ट मर्सर यांची कंपनी कॅम्ब्रिज ऍनालिटिका आणि ट्रम्प यांचे मुख्य सल्लागार स्टीव्ह बॅनन यांच्या नेतृत्वाखालील कंपनीने 2014 च्या सुरुवातीस परवानगीशिवाय फेसबुक वरील वैयक्तिक माहिती वापरली आहे. आणि त्याचा वापर करून एक शक्तिशाली सॉफ्टवेअर प्रोग्राम तयार करून मतदारांवर प्रभाव पाडण्यात आल्याचा खुलासा क्रिस्टोफर व्हाइली याने केला आहे.
फेसबुक वरून माहिती ग्रहण करून त्याचा वापर अमेरिकेच्या निवडणुकीवर प्रभाव पाडण्यासाठी केला गेल्याची माहिती फेसबुक ला मिळाली होती परंतु त्यांनी आपल्या उपभोगत्यांना त्याबाबतची सुचना दिली नसल्याचे उघड झाले आहे.

केंब्रिज अॅनालिटिका प्रकरण: केंब्रिज अॅनालिटिका ने कशी चोरली माहिती

२०१४ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून २ कोटी ७० लाख लोकांनी कोगन फेसबुक अॅप इन्स्टॉल केले. जे अॅप पर्सनॅलिटी क्विझ असल्याचं भासवण्यात आले होते. यात क्विझ खेळून पैसे मिळत असत आणि त्यातून कंपनीला एका व्यक्तीच्या खेळण्याने १६० युजर्सचा डेटा मिळत होता, वैयक्तीक माहितीचाही अॅक्सेस कोगनला मिळत होता. या जोरावर २ कोटी ७० लाख लोकांनी सहभाग घेत कंपनीला ५ कोटी लोकांची वैयक्तिक माहिती मिळायला मदत झाली. माहिती मिळवलेल्या युजर्सपैकी बहुतांश लोक हे अमेरिकन होते. केंब्रिज अॅनालिटिका प्रकरण असे झाले.

फेसबुक चे नुकसान:

फेसबुक ला या खुलाश्यामुळे मोठे नुकसान झाले असुन त्यांचे बाजारमूल्य 54 बिलियन डॉलर ने घसरून 488 बिलियन डॉलर एवढे झाले आहे. खुलाश्यात 50 मिलियन लोकांची माहिती चोरून वापरल्याचे उघड झाले आहे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

Twitterati cracks jokes on #FacebookDown as Facebook went down in India

सोशल मिडीया आणि आपली मानसिकता…

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.