पुण्यातील हाऊसिंग सोसायटीवर जिल्हाधिकारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

0
पुण्यातील हाऊसिंग सोसायटीवर जिल्हाधिकारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
Share

पुणे जिल्हाधिकारी यांनी सहकारी गृहनिर्माण सोसायटी यांनी पालन करावयाचे नियम वारंवार प्रसिद्ध केले आहेत. याव्यतिरिक्त नियम लावण्यास सोसायटी वाल्यांना परवानगी नाही असे वारंवार जिल्हाधिकारी यांच्याकडून सांगितले जात आहे. पुण्यातील एका सोसायटी सेक्रेटरी वर स्वतः सोसायटीचे नियम तयार केल्याबद्दल गुन्हा दाखल केला गेला आहे. औंध येथील एका हाऊसिंग सोसायटीवर हा गुन्हा दाखल केला गेला आहे.

काय आहे प्रकरण?

सोसायटीमध्ये नव्याने राहण्यासाठी आलेले कुटुंबाला मेडिकल सर्टिफिकेट शिवाय प्रवेश नाकारल्यामुळे हे प्रकरण वाढले आहे. रोहन निलय या औंधमधील सोसायटीमध्ये सुधीर मेस्सी नावाचे गृहस्थ कुटुंबासह राहण्यास आले होते. नवीन ठिकाणी स्थलांतरण केल्याने तुणचे सामान वाहण्यासाठी कामगार सुद्धा उपस्थित होते.

सोसायटी सेक्रेटरी सुनील शिवतारे यांनी मेडिकल सर्टिफिकेटची मागणी करत मेस्सी कुटुंबियांना सोसायटी गेटवर अडवले. मेडिकल सर्टिफिकेट शिवाय सोसायटीमध्ये प्रवेश नाही असे सांगितले. हे नियमबाहेर असल्याने सोसायटी वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोसायटी सेक्रेटरी सुनील शिवतारे यांच्यावर कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पुणे शहर सहकारी संस्था उपनिबंधक स्नेहा जोशी यांनी सोसायटी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कोरोना पार्श्वभूमीवर शहर आणि जिल्ह्यातील कोणत्याही सोसायट्यांनी स्वत:चे निर्बंध घालू नयेत असे स्पष्टपणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले आहे. जे कोणी या आपापले नियम बनवतील त्या सोसायटीवर दंडनीय व कायदेशीर कारवाई करण्यात येतील, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी काढलेले आहेत.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजटि्वटर आणि इंस्टाग्रामटेलिग्राम वर भेट द्या.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.