लोकशाही नसती तर बलात्कार करणाऱ्याला गोळ्या घातल्या असत्या: छत्रपती उदयनराजे भोसले
बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या असुन मा. छत्रपती उदयनराजे भोसले कायद्याचा वचप नसल्याने संतापले. जर देशात लोकशाही नसती तर बलात्काराला गोळ्या घातल्या असत्या अशा शब्दात राजेंनी आपली भूमिका मांडली. आता एकच करा, पुन्हा ‘राजेशाही’ आणा मग मी दाखवतो काय करायचे, असे खडखडीत वक्तव्य छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज मा. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले.
उदयनराजे म्हणाले, जनतेने निवडून दिलेले सदस्य, लोकप्रतिनिधी तुमच्या प्रश्नांना मार्गी लावत नसतील तर त्यांचा काय उपयोग. आज बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. याला अपवाद तुम्ही मान्य केलेली लोकशाही आहे. लोकशाही नसती तर या बलात्काऱ्याला मी गोळ्या घातल्या असत्या. आता एकच करा, पुन्हा ‘राजेशाही’ आणा मग मी दाखवतो काय करायचे ते. अशा शब्दात मा. छ उदयनराजे भोसले महाराज बोलताना कडाडले.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
शिवाजी महाराज बलात्काराच्या गुन्ह्यासाठी कोणती शिक्षा द्यायचे? चौरंग शिक्षा म्हणजे काय?
कोंडाजी फर्जंद: फर्जंद चित्रपटातील मुख्य पात्र फर्जंद कोण होता? पन्हाळगड लढाई कशी झाली