कसे आहात मंडळी…. हसताय ना….हसायलाच पाहिजे….
या वाक्याने सुरुवात होणारा ‘चला हवा येऊ द्या’ हा हास्यकल्लोळ माजवणारा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आज या कार्यक्रमाचा शेवटचा प्रयोग प्रक्षेपित होणार आहे.
अगदी काही दिवसातच यशाच्या शिखरावर पोहचणाऱ्या या कार्यक्रमाची भुरळ मराठी मनोरंजनसृष्टी इतकीच बॉलिवूडलाही पडल्याचे आपल्याला पाहायला मिळाले.
आमिर खान, सलमान खान, शाहरुख खान, रितेश देशमुख, इरफान खान, जॉन अब्राहम, रविना, नाना पाटेकर, विद्या बालन हे ‘चला हवा येऊ द्या’मध्ये आपल्या चित्रपटाला प्रसिद्धीसाठी घेऊन आले खरे पण तेच या कार्यक्रमाचे चाहते बनून गेले.
‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अक्षया देवधरचा हॉट लुक….?
कालच्या भागात कार्यक्रमाचा सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळेने स्वतःच आता थोडसं थांबण्याची वेळ आल्याचे सांगितले. मात्र, ही विश्रांती काही दिवसांची असणार आहे. काहीतरी नवं करण्यासाठी हा काही क्षणांचा दुरावा असेल असेही तो म्हणाला.
चला हवा येऊ द्या ऐवजी आता त्याजागी ‘सा रे ग म प’ हा नवीन मराठी कार्यक्रम लागणार आहे.
लवकरच चला हवा येऊ द्या माघारी येईल आणि प्रेक्षकांचे त्यात गतीने मनोरंजन करेल अशी आशा करूयात…..
“अप्सरा आली” लावणीवर रोबोटिक अंदाजातील डान्स वायरल…
तुम्हाला चला हवा येऊ द्या कार्यक्रम कसा वाटतो आम्हाला नक्की कळवा… @PuneriSpeaks #अस्सलपुणेरी