देशाकरिता मरणयातना भोगणारा सैनिक चंदू चव्हाणचे कोर्ट मार्शल.. २ महिने कोठडीची शिक्षा…

0
देशाकरिता मरणयातना भोगणारा सैनिक चंदू चव्हाणचे कोर्ट मार्शल.. २ महिने कोठडीची शिक्षा…

चंदू बाबुलाल चव्हाण ३७ रायफल्सचा जवान २९ सप्टेबरला चंदूनं चुकून सीमा ओलांडली होती. त्यानंतर तो पाकिस्तानी लष्कराच्या हाती लागला होता.

या बातमीनं धक्का बसून चंदूच्या आजीचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला होता. चंदू चव्हाण मूळचा धुळे जिल्ह्यातील बोरविहीर गावचा आहे. चंदू २०१२ मध्ये सैन्यात भरती झाले होते. २२ वर्षीय चंदू याने नुकतेच राष्ट्रीय रायफल्स जॉईन केलं होतं. चंदू यांचा मोठा भाऊ भूषणदेखील लष्करात आहे. ते सध्या ९ मराठा रेजिमेट कार्यरत आहेत.

११४ दिवस दिवस त्याने पाकिस्तानी कोठडीत मरणयातना भोगल्या आणि जानेवरी मध्ये त्याला भारतात आणण्यात आले.चंदू चव्हाणला भारतात आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाकडून सातत्याने प्रयत्न केले जात होते. अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरही चंदू चव्हाणला मायदेशी आणण्यासाठी भारताकडून प्रयत्न केले जात होते. प्रथम पाकिस्तानने असा सैनिक आमच्याकडे आहे याची कबुली देण्यास नकार दिला होता अखेर पाकिस्तानने चंदू चव्हाणची सुटका केली.

अश्या प्रकारे दिल्या होत्या मरण यातना…

२९ सप्टेबरला चंदूने चुकून सीमा ओलांडली होती. त्यानंतर तीन पाकिस्तानी सैनिकांनी त्यांना घेरले आणि मारहाण केली एकाने गोळी मारायला बंदुक काढली परंतु दुसऱ्या दोघांनी विरोध केल्यामुळे चंदू वाचला. त्यानंतर त्याचे कपडे बदलविण्यात आले त्याला पठाणी घालून दिला. तोंडावर कापड बांधून कुठेतरी अंधाऱ्या जागी चंदुला नेण्यात आले.

पाकिस्तानी सैनिकांनी त्याला कोठडीत डांबले आणि त्यानंतर सुरु झाली मारहाण अत्याचाराचा कुठलाही प्रकार त्यांनी सोडला नव्हता क्षणा क्षणाला मरण पुढे दिसत होते. खूप मारल्यानंतर सैनिक कंटाळून बाहेर जात आणि चंदू चव्हाण अर्धमृत अवस्थेत त्या अंधाऱ्या कोठडीत पडून राहत असे. दिवस रात्र काहीही कळत नसे सगळीकडे फक्त अंधारच…

भारतीय सैन्याबद्दल माहिती काढण्याकरिता हि मारहाण केली जात होती. भारता बद्दल आणि भारतीय नेत्याबद्दल वाईट शिव्या दिल्या जात होत्या. त्याचे अश्लील विडीओ सुध्दा बनविण्यात आले. परंतु लष्करी शिस्तीनुसार चंदू काहीही बोलत नसे.

मारहाणीमुळे संपूर्ण शरीर सुजले होते काही दिवसाने मारहाण झालेली कळत हि नव्हते. मारहाण करायचे आणि त्यानंतर बेशुध्द करायचे इंजेक्शन देण्यात येत असे. कधी कधी रोटी आणि पाणी खायला मिळत असे काय खात आहो हे हि त्यांना कळत नसे. झोपायला एक कांबळ दिली होती परंतु मारहाणीमुळे झोप,जेवण, चावणारे कीड काहीही कळत नसे.

पाकिस्तानी सैनिक त्याला मारत असे व चंदू जोर जोराने भारत माता कि जय ओरडत यावर ते अजून चिडून मारत असे. काही दिवसाने डोळ्यातून पाणी येणेही बंद झाले. त्या कोठडीत दिवस रात्र कळत नसे म्हणून देवाचे नाव घेणे अहिराणी भाषेत बोलणे आणि मृत्यूची विनवणी करणे हे सर्व चंदू सांगत होता.

या काळात लहानपणाचे दिवस आठवणे, ओळखीच्या लोकाचे चेहरे आठविणे हे सर्व चंदू करत असे. भिंतीशी बोलत असताना त्याला वाटायचं देव आपल्याला बोलत आहे. एकटेपणाला कंटाळून त्याने एक वेळ भगवतगीता वाचण्याकरिता मागितली होती. यामुळे पाकिस्तानी सैनिक अजून संतापले आणि थकेपर्यंत मारहाण केली.

पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी काही प्रश्न विचारल्यास तो अहिराणी भाषेत उत्तर देत असे त्यामुळे त्याला सगळे मूर्ख समजायचे आणि हसायचे. त्याला कधीच वाटले नाही कि त्याची सुटका होईल. गुंगीचे औषध देऊन त्याला भारताला परत करण्याकरिता वाघा सीमेवर आणण्यात आले अटक केल्यापासून चंदूला अंधाऱ्या कोठडीत ठेवण्यात आलं होतं. चंदूनं अटक झाल्यानंतर २१ जानेवारीला पहिल्यांदा वाघा बॉर्डरवर उजेड पाहिला. तसेच त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधून पाकिस्तानी लष्कर त्याला एका कॅम्पमधून दुसऱ्या कॅम्पमध्ये नेत होते. चंदूची बोटं तुटली होती त्याच्या गुडघ्यालाही मार लागला होता.

त्याला या धक्क्यातून सावरायला बराच वेळ लागला. खालील विडीओ मध्ये तुम्ही चंदूला स्वतःवर झालेली आपबिती सांगताना बघू शकता.

त्याच्या आजीच्या अस्थी कलशाचे विसर्जन चंदू सुटल्यावर करायचे असे घरच्यांनी ठरविले होते काही दिवसा अगोदर नाशिक येथे चंदूनि त्याच्या आजीचे अस्थी कलशाचे विसर्जन केले. यावेळेस त्याला दुख अनावर झाले होते.

या सर्व प्रकरणानंतर चंदू चव्हाणला सावरायला बरेच दिवस लागले मागे एप्रिल मध्ये त्याने परत ड्युटी जॉईन केली आणि त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. ISPR (Inter-Services Public Relations), पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार चंदू चव्हाण यांनी सांगितले कि “त्याचे व वरिष्ठ अधिकार्याचे भांडण झाल्यामुळे तो पाकिस्तानात पळून आला आहे. तो मुद्दाम सीमारेषा पार करून पाकिस्तानमध्ये आला आणि स्वतःला सरेंडर केले” असे ISPR, Pakistan कडून सांगण्यात आले.

यावर भारतीय आर्मी कोर्टने चंदू चव्हाण याला दोषी ठरवून त्याचे कोर्ट मार्शल करण्याचे आदेश दिले आहे. सोबतच त्याला २ महिन्याची जैल सुनविण्यात आली आहे आणि दंड म्हणून २ वर्षापर्यत त्याला पेन्शन हि मिळणार नाही. या विरोधात त्याला वरील कोर्टात दाद मागता येणार आहे.

परंतु कुठलाही सैनिक त्याचे वरिष्ठासोबत भांडण झाल्यावर पाकिस्तानात का जाईल हा मोठा प्रश्नचिन्ह समोर उभा राहतो ? चंदू चव्हाणला त्याच्यावर झालेल्या अनन्वित अत्याचारास न्याय मिळो हीच अपेक्षा…
Source

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.