यावर्षी राजपथावर अवतरणार छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा चित्ररथ

0
यावर्षी राजपथावर अवतरणार छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा चित्ररथ

यावर्षी प्रजासत्ताक दिनी राजपथावर छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा चित्ररथ अवतरणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा चित्ररथ

कविराज भूषण यांनी शिवाजी महाराज यांच्यावर रचलेल्या कवितेचा असा जयघोष करीत हा चित्ररथ राजपथ वर दाखल होणार आहे.

इन्द्र जीमी जंभपर, वाढव सुअंभ पर,
रावण सदंभ पर, रघुकुल राज हैं।
पौन बारी बाह पर, संतु रतीनाह पर ,
ज्यो सहस्त्रबार पर, राम द्वीजराज हैं.
हृदयात माउली रयतेस साउली,
गड़ कोट राउळी शिवशंकर हा.
मुक्तीची मंत्रणा युक्तिची यंत्रणा,
गड दुष्ट दुर्जना खलयंतर हा.
संतास रक्षितो शत्रुंसी खंदतो,
भावंड भावना संस्थापितो.
नैसा युगे युगे स्मरणीय सर्वदा,
माता पिता सखा शिवभुपतो.
दावा द्रुमदंड पर, चीता मृगझुंड पर,
भूषण बितुंड पर, जैसे मृगराज हैं।
तेज तम अंस पर, कान्हा जीमी कंस पर,
त्यों मलेछ वंस पर, शेर शिवराज हैं.

जय भवानी, जय भवानी
जय शिवाजी, जय शिवाजी
जय भवानी, जय भवानी
जय शिवाजी, जय शिवाजी

शिवरायांची महान किर्ती सांगत चित्ररथ राजपथावर अवतरणार आहे. या चित्ररथाची जबाबदारी कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी पेलली आहे. त्यांच्या संकल्पनेतून हा भव्यदिव्य चित्ररथ राजपथावर अवतरणार आहे.

 

छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा चित्ररथ महाराजांचे दिल्ली जिंकायचे स्वप्न अपूर्णच राहिले परंतु पुढे मराठा साम्राज्याने ते पूर्णही केले. त्याच दिल्लीत अनेक राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थितीत छत्रपतींच्या पराक्रमाची कीर्ती सांगणारा हा चित्ररथ दिमाखात सादर केला जाणार आहे. यावर्षी राजपथावर एकूण २३ चित्ररथ सादर होणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा चित्ररथ संकल्पना:

चित्ररथाच्या पुढच्या भागात शिवाजी महाराज यांची अश्वारुढ प्रतिकृती गडाच्या मधोमध दर्शवण्यात आलेली आहे. तर मध्यभागी रायगडाची प्रतिकृती असून त्या ठिकाणच्या मेघडंबरीत सिंहासनावर विराजित छत्रपती शिवाजी महाराज दाखवले जाणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा चित्ररथ
राज्याभिषेक सोहळ्याचे संपूर्ण रूप यात साकारले जाणार आहे. त्या ठिकाणी आभूषण देणारा दरबारी, त्याच्या शेजारी गागाभट्ट, तर या राज्याभिषेकासाठी उपस्थित असलेला इंग्रज अधिकारी सर हेन्री हेही दाखवले जाणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा चित्ररथ
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शेजारी सोयराबाई आणि संभाजीराजे बसलेले दाखवण्यात आले आहेत.
चित्ररथाच्या मागच्या भागात आसनस्थ असलेल्या राजमाता जिजाऊ दाखवल्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा चित्ररथ
संपूर्ण महाराष्ट्र या चित्ररथाची आतुरतेने वाट पाहतोय हे नक्की
कशी वाटली आपल्याला ही माहिती, आवडल्यास नक्की शेअर करा…

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

For More:
तुझ्यात जीव रंगला फेम राणादा कडे आहे ही महागडी कार

Gully Boy साठी रणवीर ने केला बॉडी मध्ये मोठा बदल

व्हॉट्सअॅपद्वारेही पैसे पाठवता येणार

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.